मांगीच्या प्राथमिक शाळेत “बाल आनंद बाजार’ उत्साहात संपन्न..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांगी (ता.करमाळा) येथे बाल आनंद बाजार उत्साहात संपन्न झाला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांगी येथे जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी श्री स्वामी यांच्या उपक्रमातुन “बाल आनंद बाजार” इ १ली ते ४थी च्या विद्यार्थ्याचा भरवण्यात आला होता, यामध्ये विद्यार्थ्यांनी पाणीपुरी, पालेभाज्या , कांदे, बटाटे, नारळ, मॅगी, चहा, सरबत, वडापाव, भजे ,पुलाव, चिवडा, पॉपकॉन इ विक्री करण्यासाठी स्टॉल उभे केले होते.
या बाजारातून आठ हजारापेक्षा जास्त विक्रीची उलाढाल झाली आहे. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाची माहिती झाली. या कार्यक्रमाचे उदघाटन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा उज्वला पाटील , उपसरपंच नवनाथ बागल यांचे हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य सुजीत बागल ,चतुराबाई शिंदे , तात्या शिंदे , नागेश बागल , कल्पना राऊत , शितल गायकवाड , शिला अवचर , अजय बागल , स्नेहल अवचर महिला जास्त संख्येने बाजार करण्यासाठी उपस्थित होते . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गट शिक्षणाधिकारी राजकुमार पाटील , जयवंत नलवडे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक संतोष पोतदार , हिरामण कौले , वैशाली पवार , सुवर्णा महामुनी , आशा देमुंडे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी ग्रामस्थ, पालक मोठया संख्येने उपस्थित होते.