केममध्ये श्रीमद् संगीत भागवत कथेचे आयोजन - Saptahik Sandesh

केममध्ये श्रीमद् संगीत भागवत कथेचे आयोजन

भागवत कथा केम

केम (प्रतिनिधी-संजय जाधव) : केम येथे कै.गोरख विष्णू तळेकर यांच्या स्मृतीनिमित्ताने श्रीराम मंदिरामध्ये दि ९ डिसेंबर ते १५ डिसेंबर पर्यंत श्रीमद् संगीत भागवत कथा आयोजित केली आहे.

ह.भ.प. सुधिर महाराज वालवड हे भागवत कथा सांगत असून त्यांना संगीत साथ गायक श्री अरविंद रत्नपारखी (अकोला), व्हायोलिन वादक श्री रामेश्वर अहेरकर(अकोला), बासरीवादक प्रशांत व्हटकर (नागपूर),तबलावादक श्री विठ्ठल पाटील( तालमणी) हे करत आहेत.

ही कथा सांयकाळी सात ते दहा या वेळेत चालू आहे. या भागवत कथेमध्ये भक्त, प्रल्हाद सती अनसूया,गोकर्ण, शंकर भगवान, समुद्र मंथन कृष्ण जन्म या विषयावर सुंदर अशा कथा होत आहे.

कृष्ण जन्माच्या कथेवेळी कृष्णाचा देखावा या ठिकाणी सादर केला. या वेळी वसुदेव टोपली मध्ये कृष्णा ला घेऊनआले होते वसुदेवाचया भूमिकेत बाळनाना तळेकर होते. या वेळी भाविकांनी फुल टाकूण स्वागत केले. त्यानंतर कृष्णाला पाळण्यात ठेवून नाव ठेवण्यात आले. नाव ठेवण्याचा कार्यक्रम झाल्यावर महिलानी कृष्णाचा सुंदर असा पाळणा म्हटला. त्यानंतर शिंकवडा, डिंक वडा वाटप केला.

या कार्यक्रमासाठी सुरेश तळेकर गुरूजी , बाळू नाना तळेकर, सचिन तळेकर,आणा तळेकर, राहुल तळेकर, दयानंद तळेकर, मधूनाना तळेकर हे परिश्रम घेत या कार्यक्रमासाठी भाविकांनी गर्दी केली होती. १५ डिसेंबर पर्यंत हा कार्यक्रम असून इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!