केममधील अंगणवाड्यानी मिळून भरविला आनंदी बाजार

केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) :लहान मुलांना सुद्धा व्यवहारिक ज्ञान येण्यासाठी व मुलांना सुद्धा वेगवेगळ्या नाण्यांची ओळख होईल या अनुषंगाने केम येथील सर्व अंगणवाड्यानी मिळून १० डिसेंबर रोजी इंदिरानगर अंगणवाडी मध्ये आनंदी बाजार घेण्यात आला.
यामध्ये केम मधील सर्व अंगणवाड्यांचा सहभाग होता. या आनंदी बाजाराचे उद्घाटन केम गावचे सरपंच आकाश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. या बाजारामध्ये चार ते पाच हजाराची उलाढाल झाली.
या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून हवेली पुणे विभागाच्या शिक्षण अधिकारी विजया गाडे ऊपस्थित होत्या. त्याचप्रमाणे या वेळी अंगणवाडी सेविका अंजली लोंखडे, धस पाटिल, मंगल कावळे, पद्मिनी तांगडे, ताई मोहिते,सुनंदा बरकडे तसेच मदतनीस रजंना कावळे,ताई नागणे,राणी तळेकर आदि उपस्थित होत्या. पालक वर्गदेखील यावेळी ऊपस्थित होता. या उपक्रमाचे केम परिसरातून कौतुक केले जात आहे. तसेच या उपक्रमाचे करमाळा तालुका शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा वर्षा चव्हाण यांनी अंजली लोखंडे यांचे कौतुक केले.