छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त ढवळस येथे रक्तदान शिबीर आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

केम(संजय जाधव): माढा तालुक्यातील ढवळस येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिनांक १३ ते १५ मे २०२५ दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती सोहळा समितीने दिली.
कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे:

- दि. १३ मे (मंगळवार) – सायंकाळी महाराष्ट्रातील प्रसिद्ध एकपात्री सोंगी भारूड ज्ञानेश्वरी भारुडी मंडळ, कडवे बुद्रुक, पाटण (जि. सातारा) यांचे झी टॉकीज फेम संतोष महाराज सादर करणार आहेत.
- दि. १४ मे – रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
- दि. १५ मे – भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत माऊली बॅन्जो, माऊली लाईट आणि वाटेफळ हे विशेष आकर्षण असणार आहेत.
ढवळस परिसरातील सर्व शिवभक्तांनी या कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ आणि शिवभक्त उत्स्फूर्तपणे मेहनत घेत आहेत.






