करमाळा अर्बन बँकेच्या निवडणुकीत नागरिक संघटनेचा एकतर्फी विजय -

करमाळा अर्बन बँकेच्या निवडणुकीत नागरिक संघटनेचा एकतर्फी विजय

0

करमाळा(दि.१३): करमाळा अर्बन बँकेच्या झालेल्या निवडणूकीत नागरिक संघटनेचा एकतर्फी विजय झाला असून १५ जागांवर पॅनेलने बहुमताने विजयी मिळविला आहे.

करमाळा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या १५ संचालक मंडळासाठी तब्बल १५ वर्षांनंतर निवडणूक घेण्यात आली. भटक्या-विमुक्त जाती-जमाती गटातुन नागरिक संघटनेचे उमेदवार गोरख जाधव यांची निवडणुकी आधीच बिनविरोध निवड झाली होती. उर्वरित १४ संचालकांच्या निवडीसाठी रविवार, दिनांक ११ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण ७१२५ मतदारांपैकी केवळ १८०१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची एकूण टक्केवारी केवळ २५.२७ इतकीच नोंदवली गेली.

सदर मतदान प्रक्रिया एकूण १६ मतदान केंद्रांवर शांततेत पार पडली. करमाळा येथे महात्मा गांधी विद्यालयात तर जेऊर,केतुर आणि कंदर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये या मतदान घेण्यात आले. यामध्ये नागरिक संघटनेने एकतर्फी वर्चस्व सिद्ध करत संपूर्ण पॅनल मोठ्या मताधिक्याने निवडून आणला. विरोधी गटाचे नेते प्रा. रामदास झोळ यांनी माघार घेतली यामुळे विरोधी गटाला दारुण पराभव स्वीकारावा लागला.

  • विजयी उमेदवार (सर्वसाधारण गट):
  • जितेश कटारिया – १४३८
  • ॲड. सुनिल घोलप – १४९५
  • अनुज देवी – १४७६
  • कन्हैयालाल देवी – १४९३
  • यशराज दोशी – १४९७
  • मोहिनीराज भणगे – १४५०
  • अभिजीत वाशिंबेकर – १५०८
  • प्रकाश सोळंकी – १४८०
  • ताराबाई क्षिरसागर – १४५८
  • कलीम काझी – १४३२
  • पराभूत उमेदवार :
  • चंद्रशेखर घोडेगांवकर – १६५
  • मालिक पिंजारी – १८२
  • ब्रम्हदेव लोंढे – १९९
  • अनुसूचित जाती-जमाती:
  • वंदना कांबळे – १५६४ (विजयी)
  • सदाशिव वाघमारे – १४२ (पराभूत)
  • इतर मागास प्रवर्ग (ओबीसी):
  • चंद्रकांत चुंबळकर – १४५१ (विजयी)
  • दिलीप गानबोटे – १४५ (पराभूत)
  • मालिक पिंजारी मलिक – ९४ (पराभूत)
  • महिला राखीव:
  • मीना करंडे – १५८२ (विजयी)
  • प्रमिला जाधव – १५१२ (विजयी)
  • नंदिनी घोलप – १०१ (पराभूत)
  • भटक्या-विमुक्त जाती-जमाती:
  • गोरख जाधव – बिनविरोध

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!