मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी संदर्भात भुमिका स्पष्ट करावी : सुनील सावंत..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी महाराष्ट्रातील महापुरुषाबद्ल विशेषता छत्रपती शिवाजी महाराजाबद्ल अपशब्द काढुन सर्व शिवप्रेमीच्या भावना दुखावल्या आहे, याबद्ल संपुर्ण राज्यात बंद ठेवण्यात आला होता, मोर्चे काढण्यात आले होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्या होणाऱ्या 25 डिसेंबर रोजी श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या मोळी टाकण्याच्या कार्यक्रमात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी सावंत गटाचे नेते सुनील सावंत यांनी केली आहे.
हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाने राज्यपाल हटाव साठी आवाज उठविला होता, परंतु राज्यपालाच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टी व शिंदे गट असल्यामुळे विरोधी गटाच्या मागणी कड़े दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसुन येत आहे महाराष्ट्राचा अभिमान तसेच रयतेचे राजे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवछत्रपतींचा अवमान राज्यपाल करतात त्यांचा अवमान म्हणजे संपूर्ण रयतेतील जनतेचा हा अवमान आहे.
या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अद्यापपर्यंत त्यांची भुमिका स्पष्ट केलेली दिसुन येत नाही, त्यामुळे मुख्यमंत्री यांनी आपली भुमिका स्पष्ट करावी तसेच करमाळा येथील शिवप्रेमींनी राज्यपाल विरोधात आंदोलन केल्यामुळे उलट करमाळ्यातील 18 जणांवर गुन्हे दाखल झाले आहे सदरचे गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे अशीही मागणी श्री सावंत यांनी सर्व शिवप्रेमीच्यावतीने केली आहे.