इरा पब्लिक स्कूलच्यावतीने 'बाजार दिनाचे' आयोजन - विद्यार्थ्यांची चार तासात हजारोंची उलाढाल.. - Saptahik Sandesh

इरा पब्लिक स्कूलच्यावतीने ‘बाजार दिनाचे’ आयोजन – विद्यार्थ्यांची चार तासात हजारोंची उलाढाल..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : चिखलठाण (ता करमाळा) येथील इरा पब्लिक स्कूलच्यावतीने ‘बाजार दिवस’ हा उपक्रम साजरा करण्यात आला या उपक्रमात विद्यार्थ्यांनी चार तासात 1 लाख 38 हजारांची झाली उलाढाल केली आहे.

इरा पब्लिक स्कूल चिखलठाण येथे बाजार दिनाचे आयोजन करण्यात आले होते, याचे उदघाटन सरपंच चंद्रकांत सरडे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती दत्तात्रय सरडे , जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड ,प्रगतशील शेतकरी आदीनाथ कारखान्याचे संचालक मा. धुळाभाऊ कोकरे . प्रशांत नाईकनवरे , गजेंद्र पोळ, अध्यक्ष डॉ ब्रिजेश बारकुंड व सर्व पालक उपस्थित होते.

या बाजारात भाजीपाला ,फळे ,स्टेशनरी , खाऊगल्ली , गृहपयोगी वस्तूंचे विविध स्टॉल्स उपलब्ध होते. लहान बालगोपाळांचा हा आगळावेगळा बाजार पाहून उपस्थितांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने आपल्या सामानांची विक्री केली. विद्यार्थ्यांच्या चढा ओढी आवाजाने संपूर्ण बाजार दुमदुमला. आपल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी चढा ओढ लागली होती.

या बाजारात चिखलठाण कुगाव ,टोपेबाबा ,केडगाव ,शेटफळ ,जेऊर व परिसरातील लोकांनी गर्दी केली होती. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणबरोबरच व्यवहार ज्ञान वाढावे. तसेच आपल्या शेतीमध्ये धान्य विकण्याची कला विकसित झाली पाहिजे आणि मुलांचा आत्तापासूनच व्यवसायिक दृष्टिकोन वाढीस लागला पाहिजे या उद्दात्त हेतूने बाजार दिवसाचे आयोजन करण्यात आलेले होते या बाजारात विद्यार्थ्यांनी तब्बल 138000/- हजारांची उलाढाल केली हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक जी.एस.कसबे यांच्यासह सर्व शिक्षक, विद्यार्थी ,पालक, शिक्षकेतर कर्मचारी व स्कूल बसचालक यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!