शेलगाव (वां) ते ढोकरी या रस्त्याच्या विशेष दुरुस्ती अंतर्गत कामाचा शुभारंभ.. - Saptahik Sandesh

शेलगाव (वां) ते ढोकरी या रस्त्याच्या विशेष दुरुस्ती अंतर्गत कामाचा शुभारंभ..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा (ता.14 ) – वांगी परिसरातील उजनी धरणामुळे पुनर्वसित 10 गावांसाठी दररोज च्या दैनंदिन दळणवळणासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या शेलगाव (वां) ते ढोकरी या 14 कि मी लांबीच्या रस्त्याच्या विशेष दुरुस्ती अंतर्गत कामाचा शुभारंभ हभप रामभाऊ महाराज निंबाळकर यांच्या हस्ते आज (ता.१४) आरकिले वस्ती येथे करण्यात आला. वांगी परिसरातील”रस्ता संघर्ष समिती ” च्या पाठपुराव्याला मोठे यश प्राप्त झाले असून परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शेलगाव वा ते ढोकरी या रस्त्यासाठी उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीने अनेक वर्ष संघर्ष केला. रास्ता रोको ,उपोषणे या माध्यमातून आवाज उठवला. अखेर याची दखल घेत तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री विजयसिंह मोहिते पाटील, तत्कालीन आमदार शामलताई बागल यांच्या शिफारशीनुसार पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत 14 कि मी रस्त्याचे काम 2010 साली मंजूर करण्यात आले. 2013 साली हे काम पूर्ण झाले. वांगी परिसरातील दळणवळणाची अत्यंत उत्तम सोय यामुळे झाली.

मात्र दहा बारा वर्षानंतर अनेक ठिकाणी हा रस्ता खराब झाला होता. अनेक ठिकाणी रस्ता उखडून खड्डे पडले होते. त्यामुळे प्रवाशांना त्रास होत होता. वांगी परिसरातील रस्ते ,पाणी ,वीज यांच्या बाबतीत निर्माण होणार्या समस्या सोडविण्या साठी कार्यरत असलेल्या रस्ता संघर्ष समिती ने पुढाकार घेऊन पंतप्रधान ग्रामसडक योजनें च्या कार्यलयाशी सततचा संपर्क ठेवून विशेष दुरुस्ती अंतर्गत निधी मिळवण्याचा प्रयत्न केला.

या कार्यालयाचे उपअभियंता विलास ढेरे , कनिष्ठ अभियंता भिलारे यांच्या मार्फत निधी मागणीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला. पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या सोलापूर येथील कार्यालयाशी रस्ता संघर्ष समितीचे प्रमुख पदाधिकारी प्रा.शिवाजी बंडगर ,शहाजीराव देशमुख, महेंद्र पाटील, भारत साळुंके,विठ्ठल शेळके, अर्जुन तकीक, आदिनी सततचा पाठपुरावा ठेवत या कामासाठी 2 कोटी 65 लाख रुपये मंजूर करून घेतले. या कामाचा शुभारंभ आज शेलगाव वा ते ढोकरी दरम्यान भिवरवाडी हद्दीत आरकिले वस्ती येथे ह भ प रामभाऊ महाराज निंबाळकर यांचे हस्ते करण्यात आला.

या प्रसंगी आदिनाथ चे माजी उपाध्यक्ष शहाजीराव देशमुख, बाजार समितीचे माजी सभापती प्रा.शिवाजी बंडगर , माजी संचालक भारत साळुंके ,पांडुरंग जाधव, केळी उत्पादक संघाचे अध्यक्ष महेंद्र पाटील, वांगीचे माजी सरपंच विठ्ठल शेळके,केळी उत्पादक संघाचे सचिव अर्जुन आबा तकीक, आदिनाथचे प्रशासकीय संचालक दिपक देशमुख,वांगी सोसायटीचे संचालक विकास पाटील, नागनाथ मंगवडे ,युवा कार्यकर्ते रामेश्वर तळेकर, वांगी 4 चे सरपंच रामभाऊ सूळ ,उपसरपंच डाॅक्टर भाऊसाहेब शेळके ,ढोकरीचे सरपंच अनिल वळसे ,सदस्य अमर आरकिले,अनिल आरकिले ,पैलवान शिवाजी खरात,माजी सरपंच शंकर खरात,भारत सलगर, महादेव वाघमोडे,पांडुरंग गडदे, शंकर सांगवे,बाजार समितीचे माजी संचालक बाबासाहेब बोरकर ,बाबासाहेब चौगुले,महादेव बंडगर, आदित्य बंडगर, तात्यासाहेब सरडे,दादासाहेब भोसले ,महादेव नलवडे ,आबा सरडे ,विठ्ठल सरडे , वैभव पाटील, गणेश पाटील, सुधीर देशमुख, संजय आरकिले , उत्तम धनवे , मामा मांढरे ,आगतराव मांढरे , धनसिंह शेटे ,प्रकाश पाटील, बाळू आरकिले ,काकासाहेब बोरकर,रेवा महाडीक, शिवाजी कांबळे ,दत्तू सरडे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!