इरा पब्लिक स्कूलमध्ये संविधान दिन, विद्यार्थी बक्षीस समारंभ, पालक मेळावा संपन्न..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : इरा पब्लिक स्कूलमध्ये संविधान दिनाचे औचित्य साधून संविधान पत्रिकेचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर व ज्ञानजोती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिव्हाळा गृप चे श्री .प्रशांत नाईकनवरे हे होते. वेगवेगळ्या स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला.
पालक मेळाव्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा.मनोज वाबळे यांचे “सुजाण पालक” या विषयावरील व्याख्यान वाबळे आपल्या विचारांनी सर्व पालकांना मंत्रमुग्ध केले. आई आणि वडील हे आपल्या विद्यार्थ्यांचे कसे भविष्य घडवतात हे उदाहरणे देऊन स्पष्ट केले.
रामायण , बुद्धीचारित्र ,जगप्रसिद्ध लेखकांचे दाखले देऊन त्यांनी आपल्या पाल्याला कसे संस्कारित करावे हे सांगितले. सरांच्या आई विषयीच्या कवितेने तर उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. इरा पब्लिक स्कूलच्या प्रगतीविषयी संस्थेचे व इथल्या शिक्षकांचे कौतुक केले.
या कार्यक्रमाचे शाळेतील संध्याराणी श्रीकृष्ण लबडे व विराज प्रशांत नाईकनवरे या विद्यार्थ्यांनी केलेल्या अप्रतिम सूत्रसंचालनाचे प्रमुख पाहुणे व पालकांनी भरभरून कौतुक केले. हा कार्यक्रम पाहून उपस्थित सर्वांनी शाळेचे कौतुक केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष , मुख्याध्यापक ,शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व आमच्या शाळेच्या ड्रायव्हर बंधूनी अविरत परिश्रम घेतले.