वडशिवणे तलावावर येणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करावा : सरपंच जगदाळे यांची मागणी.. - Saptahik Sandesh

वडशिवणे तलावावर येणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करावा : सरपंच जगदाळे यांची मागणी..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : वडशिवणे (ता. करमाळा) येथील तलाव यावर्षी पूर्ण क्षमतेने भरला असून, या तलावाच्या भरावावर शेकडो जनावरे चरण्यासाठी येतात. या जनावरांमुळे तलावाच्या भरावाला धोका निर्माण झालेला असल्याने पाटबंधारे विभागाने या जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वडशिवणे येथील सरंपच विशाल पांडूरंग जगदाळे यांनी केली आहे.

याबाबत ग्रामपंचायत वडशिवणे मध्ये २ नोव्हेंबर रोजी झालेल्या मासिक बैठकीत ठराव क्र.६ अन्वये सदर भरावावर येणाऱ्या जनावराने भराव खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच तलावात माती घसरून पडत आहे. त्यामुळे सदरची जनावरे थांबवावीत तसेच या भरावावरील झाडेझुडूपे काढून त्याची देखभाल करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

याबाबत पाटबंधारे विभागाने तातडीने कारवाई करावी अन्यथा ग्रामस्थ तीव्र आंदोलन करतील असाही इशारा सरपंच विशाल जगदाळे, उपसरपंच अमर उघडे, सदस्य अशोक जगदाळे, ग्रामस्थ जोतीराम वाघमारे, संदीप साळुंखे आदींनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!