सिना कोळेगाव धरणातुन भोत्रा बंधाऱ्यात उन्हाळी आवर्तन पाणी सोडण्याबाबत आवाटी, नेरले येथील शेतकऱ्यांची मागणी..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.२३) : सिना कोळेगाव धरणातुन भोत्रा बंधाऱ्यात उन्हाळी आवर्तन पाणी सोडण्याबाबत आवाटी, नेरले (ता.करमाळा) येथील सर्व शेतकऱ्यांनी व नागरिकांनी उपकार्यकारी अभियंता कार्यालय परंडा (ता.परंडा) यांना निवेदन दिले असून याद्वारे पाण्याची मागणी केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे कि, भोत्रा को.प.बंधाऱ्यातील शेतक-यांनी या वर्षी उन्हाळी पिक ऊस भुईमुग या पिकांची मोठया प्रमाणात लागवड केली आहे या बंधाऱ्यावर आवाटी, रोसा, नेरले, भोत्रा, मुंगशी, लोणी, परंडा इत्यादी गावचे लोक लाभ क्षेत्रात येत आहेत. बंधाऱ्याच्या सिंचनायोग्य क्षेत्र ३८३ हेक्टर ऐवढे असुन, बंधाऱ्याची साठवण क्षमता २.९५ द.ल.घ. मि. ऐवढे आहे गेले २५ दिवस झाले आवाटी येथील नदी पात्र कोरडे असुन या हंगामातील पहिले अवर्तन ४ एप्रिल रोजी सोडण्यात आले होते.
आज रोजी नदी व बंधाऱ्यात पाणी नसुन, कोरडा पडला आहे. उन्हाळी पिक वाचवण्यासाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे, या सर्व बाबींचा विचार करून आपले कार्यालयाने तात्काळ पाणी सोडणेसाठी आवश्यकता कार्यालयीन प्रक्रिया करून सहानीपूर्वक विचार करून लाभधारक शेतकरी पाण्यापासुन वंचित राहणार नाहीत. हे विचारात घेवुन पाणी सोडण्याचा विषयी शिघ्र गतीने कार्यवाही करावी अशी सर्व लाभधारक शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. या निवेदनावर रामचंद्र गोविंद शिंदे, साजिद मुलानी, तात्या नलवडे, कौसर शेख, मोसीन पटेल, तौफिक शेख, इस्माईल पठाण, नानासाहेब बंडगर, शौकत पटेल, सादिक पटेल आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.