केम-दहिवली रस्त्यावरील खड्डा बुजविण्याची मागणी
केम (संजय जाधव): केम येथील संभाजी चौकातून जाणाऱ्या केम-दहिवली रस्तावर मोठा खड्डा पडला असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना याचा त्रास होत असून हा खड्डा ग्रामपंचायतीने त्वरित बुजवून घ्यावा अशी मागणी शिवसेना महिला आघाडी अध्यक्ष वर्षा चव्हाण यांनी ग्रामपंचायतीला निवेदनाव्दावरे दिला आहे. यावर लवकरात लवकर कार्यवाही झाली नाही तर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या रस्त्यावर दुचाकी, चारचाकी वाहनांची नेहमीच वर्दळ असते. खड्ड्यामुळे वाहने चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. पडलेल्या खड्ड्यात पाणी साठले असल्याने मोटरसायकल घसरून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. याच मार्गावरून एसटी देखील जाते. खड्ड्यात एसटी पलटी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावातील लोकप्रतिनिधी या रस्तावरूण जातात तरी ते गप्प बसतात हा रस्ता त्वरीत दुरूस्त करून खडा बुजवावा असी मागणी शिवसेना महिला आघाडीने केली आहे.