बहुजन संघर्षसेनेकडून करमाळा तहसील कार्यालयासमोर निदर्शने -

बहुजन संघर्षसेनेकडून करमाळा तहसील कार्यालयासमोर निदर्शने

0

केम (संजय जाधव) : सध्या महाराष्ट्रात गाजलेल्या हत्या प्रकरणातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटूंबियांना न्याय मिळाला पाहिजे अशा मागणीचे  निदर्शने बहुजन संघर्ष सेनेने करमाळा तहसील कार्यालयासमोर केली.

बहुजन संघर्षनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांनी घोषणा देत तहसील कचेरीचा परिसर दणाणून सोडला. आंदोलन कर्त्यांसमोर बोलताना राजाभाऊ कदम म्हणाले संतोष देशमुख यांची अमानुष निर्घृण हत्या झालेली आहे हे पाहून महाराष्ट्र हळहळला आहे. संतोष देशमुखाचे मारेकरी वाल्मिक कराड सहित सर्वांवरती मोका व कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही महाराष्ट्राची मागणी आहे. धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरती मंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे धनंजय मुंडे यांना संपूर्ण महाराष्ट्र राजीनामा मागत आहे.

त्याचं प्रमाणे सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीमध्ये पोलिसांच्या अमानुष मारहाणीमध्ये मृत्यू झाला मृत्यूस कारण ठरलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवरती ३०२ चा गुन्हा दाखल झाला पाहिजे व  सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयाची मदत शासनाने तातडीने केली पाहिजे सोमनाथ सूर्यवंशी हा विद्यार्थी परभणी येथे शिवाजी महाराज लॉ कॉलेजमध्ये कायद्याचं शिक्षण घेत होता त्याचा मृत्यू पोलीस कस्टडीत झाला आहे त्यामुळे संबंधित पोलीस अधिकारी कायद्याच्या कचाट्यातून सुटता कामा नये.
परभणी येथे संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यामुळे आंबेडकरी जनता रस्त्यावरती उतरली पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करून तरुण भीमसैनिकांवरती गुन्हे दाखल केले ज्या भीमसैनिकांचे शिक्षणाचे आणि नोकरीचे वय आहे त्यांच्यावरील गुन्हे शासनाने माघारी घ्यावेत कारण कायदा सुव्यवस्था शासनाने अभाधित ठेवली असती तर संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली नसती आणि आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरली नसती मात्र कायदा सुव्यवस्था ठेवण्यामध्ये गृह  खात पोलीस प्रशासन कमी पडते म्हणून अशी घटना घडली याला सर्व जबाबदार महाराष्ट्राचे गृह खात आहे म्हणून भीम सैनिकावरील गुन्हे त्वरित पाठीमागे घ्यावेत.

संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही प्रमुख मागणी घेऊन आम्ही आंदोलन केले पुढे बोलताना राजाभाऊ कदम म्हणाले येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ईव्हीएम मशीनवर न  घेता बॅलेट पेपरवर घेतल्या पाहिजेत ईव्हीएम या विरोधात देशात वातावरण तयार होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अमित शहा यांनी संसदेमध्ये अवमानकारक उदगार काढले ईव्हीएम विरोधातील जनतेचे लक्ष हटवण्यासाठी असे उद्गार काढून जनता अमित शहा यांचा निषेध करण्याच्या कामाला लागली दिशाभूल करण्याचं काम सतत भाजप करत आहे.

करमाळा तालुक्यातील पोलीस प्रशासनाने नागरिकांशी माणुसकी जपली पाहिजे नागरिकांच्या फिर्यादीची तत्काळ दख्खल घेतली पाहिजे अन्यथा करमाळ्याचा बीड व्हायला वेळ लागणार नाही महसूल प्रशासनाने सुद्धा नागरिकांची वेळेत कामे करावीत आत्ता तालुक्याचे आमदार नारायण आबा पाटील आहेत ते सदैव जनतेच्या कामाला प्राधान्य देतात हे प्रशासनाने लक्षात ठेवावे नारायण आबांच्या काळात प्रशासन सुता सारखे सरळ होईल यात तीळ  मात्र मला शंका नाही. बहुजन संघर्ष सेना सदैव जनतेच्या प्रश्नासाठी आंदोलन करत राहील.यावेळी वाघमोडे सर शहाजी झिंजाडे विनोद गरड हनुमंत खरात यांची भाषणे झाली.

यावेळी आंदोलनात उपस्थित सोगाव चे सरपंच विनोद सरडे, सालसेचे सरपंच सतीश ओहोळ, खातगावचे सरपंच अविनाश मोरे, उमरडचे सरपंच संदीप मार्कड, वरकटनेचे सरपंच गणेश घोरपडे, भीमराव घाडगे, शहराध्यक्ष आजिनाथ कांबळे, शहर सचिव कालिदास कांबळे, तालुकाध्यक्ष अंगद लांडगे,बळीराजा शेतकरी संघटना अध्यक्ष आण्णा सुपनवर, एड. राहुल कांबळे,  विनोद गरड,  दत्ता राक्षे, अतुल राक्षे, अधिक शिंदे, लालमन भोई, दिगंबर हजारे, अतुल चव्हाण, शुक्राचार्य ठोसर, राहुल खरात,प्रेमाचंद कांबळे, संजय तनपुरे, नामदेव पालवे, अर्जुन भोसले, महादेव कडाळे, मनोज कांबळे, महावीर अत्रे शिवाजी गायकवाड, प्रशांत गरड, प्रवीण कांबळे प्रवीण सुरवसे, शत्रुघन सरोदे, कैलास सरोदे, हरिश्चंद्र भोसले, बाळू परदेशी, दादा भोसले, महेश भोसले,हरिशन्द्र भोसले, जितेंद्र लांडगे, सतीश कांबळे, बुद्धभूषण कांबळे, राहुल खरात, शेखर गाडे, आबा कदम,कैलास कदम आदी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!