करमाळा बस स्थानकातील कॉंक्रिटीकरण निकृष्ट दर्जाचे – महेश चिवटे

करमाळा(दि.१४) : करमाळा बस स्थानकातील कॉंक्रिटीकरण करण्यासाठी दोन कोटी रुपये मंजूर केले होते. अंदाजपत्रकाप्रमाणे खडी न वापरता माती मिश्रित मुरूम वापरत असल्यामुळे रस्त्याचे काम निकृष्ट होत असूनची चौकशी करावी अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी एसटी महामंडळाचे बांधकाम विभागाचे अधिकारी चौधरी यांच्याकडे केली आहे.
यावेळी डेपो मॅनेजर होनराव यांनी या कामाचे फोटो काढून वरिष्ठ कार्याला पाठवले आहे असे सांगितले. आज चिवटे यांनी बस स्थानकात जाऊन रस्त्याच्या कामाची पाहणी केली.


याविषयी प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, गेल्या 25 वर्षानंतर करमाळ्याच्या बस स्थानकाला रस्त्यासाठी पैसे मंजूर झाले आहेत. हे काम निकृष्ट दर्जाचे झाले तर पुन्हा वीस वर्षे काम होणार नाही एसटी महामंडळाचे बांधकामकडे लक्ष नाही.करमाळा बस स्थानकातील पेट्रोल पंपा समोर 47 लाख रुपये सिमेंट रस्त्यासाठी उद्योग खात्याकडून उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मंजूर केले आहेत. पावसाळ्यात एसटी स्टँड मध्ये सर्वत्र पाणी साठल्यामुळे प्रवाशांची कुचंबना होते.



