'ईद'च्या निमित्ताने कुंभेज येथे दिला जातोय एकात्मतेचा संदेश - दिग्विजय बागल - Saptahik Sandesh

‘ईद’च्या निमित्ताने कुंभेज येथे दिला जातोय एकात्मतेचा संदेश – दिग्विजय बागल

करमाळा(दि.२): कुंभेजच्या पठाण, शेख कुटुंबीयांकडून  सर्व समूदायाना सोबत घेऊन साजरी केली जाणारी ईद ही आगळी वेगळी असून यातून एकात्मतेचा संदेश दिला जात आहे असे प्रतिपादन मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिग्विजय बागल यांनी केले.

कुंभेज येथील पैगंबर पठाण, अमीन पठाण आणि आदम मकबूल शेख परिवार मागिल पाच वर्षांपासून ज्योतिर्लिंग मंदिरात सार्वजनिक स्वरूपात रमजान ईद आणि शिरखुर्म्याचा आनंद सर्वधर्मीयांसोबत एकत्र येऊन साजरा करत आहेत. याप्रसंगी पठाण कुटुंबियांकडून शिवसेना नेते दिग्विजय बागल यांना सन्मानित करण्यात आले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, स्व.लोकनेते दिगंबरराव बागल हे महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री असताना वंचित व अल्पसंख्यांकांचे प्रश्न सोडवण्यास त्यांनी कायम प्राधान्य दिले. हाच समतेचा विचार बागल कुटुंबीय आजही जपत आहे. सर्व धर्मीय मित्रपरिवार मंदिरात शिरखुर्म्याचा आनंद घेतात हे विशेष उदाहरण असल्याचे बागल यांनी सांगितले.

यावेळी उपस्थितांना शिरखुर्माची मेजवानी देण्यात आली.  कुंभेजचे मा. सरपंच गोकुळ शिंदे, सुरेश शिंदे, कल्याणराव साळुंके, महादेव शिंदे, राजेंद्र शिंदे, दिलीप पवळ, बाबा शिंदे, संतोष शिंदे, अशोक पवळ, बलभीम पवळ, शंकर वाघमारे , पैगंबर पठाण, अमीन पठाण, आदम शेख, ज्ञानेश्वर शिंदे, विशाल चौगुले, दादा जाधव, आश्रु तोरमल, किसन शिंदे, किशोर कदम, संतोष घोरपडे, सचिन शिंदे, तानाजी चांदणे, रविंद्र पवळ, सोमनाथ पवळ तसेच कुंभेज मधील बहूसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!