ईदगाह मैदानावर झाले रमजान ईदचे नमाजपठण – पो.नि. घुगे यांचा विशेष सत्कार

करमाळा(दि.२): मार्च रोजी रमजान ईद निमित्त करमाळा शहरातील ईदगाह मैदान येथे करमाळा शहरातील व तालुक्यातील हजारो मुस्लीम बांधवांच्या उपस्थित मुश्ताक काझी यांच्या मार्गदर्शनाखाली रमजान ईदची नमाजपठण करण्यात आली तर खुदबा पठण मुजाहिद काझी यांनी करुन ईद उल फित्रची नमाज पुर्ण करण्यात आली.
यावेळी करमाळा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांचा सकल मुस्लीम समाजाच्या वतीने शहर काझी कलीम काझी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. करमाळा शहरात आणि तालुक्यात रमजान महिन्याच्या काळात योग्य असा पोलीस बंदोबस्त ठेवुन सामाजिक सलोखा ठेवल्याबद्दल हा सत्कार करण्यात आला.
यावेळी समीर शेख, मुजाहीद काझी, सुरज शेख, रमजान बेग, मुस्तकीम पठाण, इम्तियाज पठाण,अशपाक जमादार, अशपाक पत्रकार, अलिम पत्रकार, सोयल पठाण , इम्रान पैलवान, जमीर काझी, व हजारो मुस्लीम बांधव उपस्थित होते.





