करमाळा येथे उद्या दिवाळी पहाट व पुरस्कार वितरण समारंभ
करमाळा /प्रतिनिधी : दिवाळीनिमित्त ‘यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेचे प्रा. गणेश करे-पाटील यांच्या वतीने “दिवाळी संगीतमय पहाट”चे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दिनांक २६ ऑक्टोबर रोजी पहाटे ५.३० वाजता यशकल्याणी सेवाभवनच्या भव्य प्रांगणात हा कार्यक्रम सादर होणार आहे.
यावेळी पुणे येथील प्रसिद्ध पार्श्र्वगायक प्रवीण कुमार हे “स्वर तेजोमय पहाट” प्रस्तुत करणार आहेत. या स्वर समूहातील प्रवीण कुमार यांच्यासह राजू जाधव, मंजुषा देशपांडे, सईद बाबा खान, सोमनाथ फाटके, पंडित गोविंद कुडाळकर आणि भालचंद्र हे श्रोत्यांना संगीतमय मेजवानी सादर करणार आहेत.
प्रसिद्ध टीव्ही अँकर आणि निवेदिका रत्ना दहिवलेकर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत.तसेच यानिमित्ताने शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कृषी,कला क्रिडा आदि विविध क्षेत्रातील मान्यवरांना यशकल्याणी करमाळा समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
तरी सर्व रसिक श्रोत्यांनी बुधवार दिनांक 26 ऑक्टोबर रोजी पहाटे ५:३० वाजता या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थचे अध्यक्ष प्रा.गणेश करे-पाटील यांनी केले आहे.