पोथरे येथे उद्या दिवाळी – पाडवा मेळावा व पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : आम्ही पोथरेकर व्यावसायिक ग्रुपच्यावतीने उद्या (ता.२६) बुधवारी दिवाळी पाडव्यानिमित्त पोथरे ग्रामस्थ व व्यावसायिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तसेच यानिमित्ताने करमाळा शहर तसेच शहराबाहेरील व्यावसायिक, गावातील शेतकरी व महिला यांना ‘सन्मान पोथरेकरांचा’ या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील हे राहणार असून, प्रमुख पाहूणे म्हणून बालरोग तज्ञ डॉ. प्रशांत करंजकर, डॉ. वर्षा करंजकर, ॲड. अपर्णा पद्माळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात योगेश चव्हाण, आबासाहेब झिंजाडे, ॲड. प्रतिक्षा शिंदे, नितीन साळुंके आदी सत्कारमुर्तीचा सन्मान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम २६ ऑक्टोबरला सकाळी साडेआठ वाजता पोथरे बसस्थानक येथे होणार आहे. तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त ग्रामस्थांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आम्ही पोथरेकर व्यावसायिक ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.