‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर करमाळेकरांच्या भेटीला

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांच्या येत्या 6 फेब्रुवारी रोजी असणाऱ्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी भव्य हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाला ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेतील अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर या उपस्थित राहणार आहेत.
तसेच RJ अक्षय प्रस्तुत ‘न्यू होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम देखील यावेळी आयोजित केलेला आहे.

यामध्ये महिलांसाठी विविध खेळ आयोजित केले असून बक्षिसे दिली जाणार आहेत.प्रथम बक्षिस LED TV, द्वितीय बक्षीस वॉशिंग मशीन, तिसरे बक्षीस मिनी आटा चक्की व उत्तेजनार्थ बक्षिसे दिली जाणार आहेत.

हा कार्यक्रम करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या क्रीडांगणात ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला करमाळा तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!