'जन्मदिन'च ठरला 'मृत्यूदिन'- शेटफळ च्या युवकाचे अपघातात निधन.. - Saptahik Sandesh

‘जन्मदिन’च ठरला ‘मृत्यूदिन’- शेटफळ च्या युवकाचे अपघातात निधन..

शेटफळ (ना) / संदेश प्रतिनिधी : वाढदिवस साजरा करून हॉटेलवरून जेवण करून घरी येताना झालेल्या अपघातात शेटफळ (ता.करमाळा) येथील 25 वर्षीय तरूणाचा मुत्यू झाला आहे. त्यामुळे वाढदिवसाच्या दिवशीच त्याला मृत्यने गाठल्याने त्याचा जन्मदिनच ठरला मृत्यूदिन…

यात हकीकत अशी की, शेटफळ (ना) येथील विकी जयसिंग डिगे याचा २८ जानेवारी रोजी 25 वा वाढदिवस होता. संध्याकाळी आठ वाजता गावातील मित्रांनी फेटा बांधून केक कापून त्याचा वाढदिवस साजरा केला होता, यानंतर जवळच्या शेलगाव गावातील मित्रांनी वाढदिवस साजरा करण्यासाठी शेलगाव चौक येथे बोलावले होते, त्याठिकाणी वाढदिवस साजरा करून जेवण करून रात्री अकराच्या सुमारास घरी परतत असताना शेलगाव-जेऊर रस्त्यावर महावितरण कार्यालयाच्या दरम्यान अज्ञात वाहनाशी धडक होवून झालेल्या अपघातात त्याचे निधन झाले.

हा अपघात एवढा मोठा होता की, अपघातानंतर गाडीने पेट घेतला, त्याचबरोबर पोलीसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, त्याप्रसंगी गंभीर जखमी असलेल्या विकी डिगे याला उपचारासाठी करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात हालवण्यात आले, परंतु तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. विकी हा आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता, आईवडील मोलमजुरी करत आहेत, तो स्वतः केळी खरेदीचा व्यवसाय करत होता, एकूलत्या एक कमवता मुलाच्या अशा अपघाती निधनामुळे या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या घटनेनंतर या परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!