केममध्ये १४ फेब्रुवारीला डॉ.बापूजी साळुंखे साहित्य संमेलन
केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) : प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केम यांच्या वतीने शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे मराठी साहित्य संमेलन वर्ष पाचवे मोठ्या उत्साहात आयोजन केले आहे. बुधवार ,दि. 14 फेब्रुवारी 2024 रोजी होणाऱ्या या एक दिवसीय मराठी साहित्य संमेलनात वैचारिक मेजवानीने भरलेले परिपूर्ण असे कार्यक्रम आहेत.
या साहित्य संमेलनाच्या उदघाटक पदी यशकल्याणी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री गणेश करे पाटील तर अध्यक्ष पदी करमाळा गटशिक्षणाधिकारी श्री राजकुमार पाटील साहेब हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सीईओ श्री कौस्तुभजी गावडे , मराठवाडा विभाग प्रमुख प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख हे उपस्थित राहणार आहेत.
या साहित्य संमेलनात ग्रंथ दिंडी, भव्य शोभायात्रा, उद्घाटन समारंभ, परिसंवाद, नटसम्राट नाटक, वऱ्हाड निघाले लंडनला एकांकिका, मैफिल गाण्यांची, कथाकथन, निमंत्रितांचे कवी संमेलन असे बहारदार कार्यक्रम होणार आहेत. तरी या साहित्य संमेलनात सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य श्री सुभाष कदम व शालेय समिती अध्यक्ष श्री वसंत तळेकर यांनी केले आहे.