रोपळे येथे छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळयाचे अनावरण
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – माढा तालुक्यातील रोपळे येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून २८ लाख रूपये खर्च करून शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे अनावरण छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते १५ सप्टेंबर रोजी करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष पदी भाजपाचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील होते या वेळी संभाजी राजे म्हणाले कि रोपळे ग्रामस्थांनी माझे स्वागत केले हा माझा सन्मान नसून हा शिवाजी महाराज यांचा आहे छत्रपती च्या काळात जसे सुराज्य होते त्याच धर्तीवर सुराज्य निर्माण करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. यामध्ये मी कसलेही राजकारण आणणार नाही. या वेळी त्यांनी रोपळे ग्रामस्थांचे कौतुक केले. या गावात वैचारिक बैठक आहे. आपल्या भाषणात त्यांनी तात्यासाहेब गोडगे यांचे कौतुक केले.
आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील म्हणाले आज गावच्या विकासासाठी तरूणानी एकत्र येऊन हातभार लावला पाहिजे. रोपळे-केम-कंदर-कन्हेरगाव या १४५ कोटी रुपयांच्या रोडला शासनाचा हिरवा कंदील मिळाला असून लवकरच त्याचे काम सुरू होइल. या मुळे रोपळे केम या गावचा विकास होणार आहे. कंदर येथे केळी संशोधन केंद्र देखील लवकरच सुरू करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले
केम येथील स्वराज्य मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्थेच्या वतीने मर्दानी खेळाच प्रात्यक्षिकं झालं. यात लेझिम हलगी, ढोल यांचा समावेश होता. अक्षय तळेकर यांनी पुतळ्याच्या अनावरणा वेळी शिवगर्जना करून आसमंत दणाणून लावला. तसेच युवराज छत्रपती संभाजी महाराज यांना धोप तालावर भेट देऊन त्यांचे स्वागत केले.
यावेळी स्वराज्य जिल्हाप्रमुख प्रा. महादेव तळेकर, माजी आमदार नारायण पाटील, श्रीमंत कोकाटे कृषी रत्न पोपटराव पवार, संजय कोकाटे प्रा राजेंद्र दास राहुल पोकळे यानी विचार व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तात्यासाहेब गोडगे यांनी केले. या वेळी व्यासपीठावर सवितादेवी राजेभोसले, शिवाजी कांबळे, बाळासाहेब पाटील माजी जि,प, अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे,माजी सरपंच युवा नेते अजितदादा तळेकर,संजय पाटील घाटणेकर, संजय टोणपे दत्ता गवळी दळवी सर, व्यंकटेश पाटील बाबाराजे बागल, आदि उपस्थित होते या कार्यक्रमासाठी रोपळे, केम कुडूवाडी परिसरातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमासाठी रोपळे येथील तरूण मंडळी ने परिश्रम घेतले