शालेय जिल्हास्तरीय स्पर्धेत करमाळा येथील त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लबचे सुयश - Saptahik Sandesh

शालेय जिल्हास्तरीय स्पर्धेत करमाळा येथील त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लबचे सुयश

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – 16 सप्टेंबर रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब मछिंद्र नुस्ते विद्यालय कविटगाव येथे पार पडल्या. ज़िल्हा स्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेत सोलापूर ज़िल्हातील विविध शाळांनी सहभाग नोंदवला होता. त्यात त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब करमाळाच्या अकरा खेळाडूनी १४, १७ व १९ वर्षाखालील मुलांच्या मुलींच्या गटात सहभाग नोंदविला होता. आणि अकरा ही मल्लखांब खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

14 वर्षा खालील मुलींच्या गटात संस्कृती दीपक पाटोळे हिने प्रथम क्रमांक तर भाग्यश्री महामुनी हिने पाचवा क्रमांक मिळवला. 14 वर्षाखालील मुलांच्या गटात रणवीर सचिन चेंडगे याने त्रितिय क्रमांक तसेच जयराज सचिन दळवे याने पाचवा क्रमांक मिळवला. 17 वर्षा खालील मुलींच्या गटात कु- साक्षी ईश्वर खुळे हिने प्रथम क्रमांक तर राजलक्ष्मी दत्तात्रय सुतार हिचा तिसरा क्रमांक आला. 17 वर्षाखालील मुलांच्या गटात अनिकेत करे याचा चतुर्थ क्रमांक आला 19 वर्षाखालील मुलींच्या गटात संयुक्ता संतोष सोनके हिचा प्रथम क्रमांक आला 19 वर्षाखालील मुलांच्या गटात गोरक्ष नाथा लोंढे याचा दुतीय तर मछिंद्र नाथा लोंढे याचा त्रितिय तर समाधान क्षीरसागर याचा चतुर्थ क्रमांक आला. त्यांच्या या यशमागे त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब चे मल्लखांब खेळाचे कोच सागर शिरस्कर सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे* . वरील विजयी खेळाडूंची पुणे विभागीय शालेय मल्लखांब स्पर्धेसाठी निवड झाली . वरील अकरा खेळाडूचें करमाळा शहरातून, ग्रामीण भागातून व सर्व स्तरातून खेळाडूचे अभिनंदन, कौतूक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!