देशी गाई सांभाळणाऱ्या व बैलजोडी असणाऱ्या शेतकऱ्यांचा केम येथे केला सन्मान
केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) : राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात केम (ता.करमाळा) येथील गोसेवक परमेश्वर तळेकर यांनी गोपालन,गोसंर्वधन वाढावं यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून ज्या देशी गाई पाळणाऱ्या गोपालकांचा व बैलजोडी असणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान केला.
यावेळी गोपालक म्हणून एकूण १७ गोपालकांच सन्मान करण्यात आला.यावेळी बैल जोड सांभाळणाऱ्या १५ बैल जोड मालकांच सन्मान करण्यात आला.हा सन्मान करताना त्यांना आरोग्यमंत्र पुस्तक,गो दंतमंजन श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
परमेश्वर तळेकर यांच्या वस्तीवर (केम) हा कार्यक्रम आयोजित केला होता.सुरूवातीला कपिला गायींचे गोपुजन श्री राम ॲग्रो टेंर्भुणी दत्तात्रय फराडे यांच्या हस्ते करण्यात आले.राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन सत्यवान दादा सुर्यवंशी यांच्या हस्ते झाले व मान्यवरांनी गोमातेचे व प्रतीमेचे पुजन करून दर्शन घेतले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्जेराव बिचितकर हे होते तर प्रमुख पाहुणे दत्तात्रय फराडे, प्रा.डॉ मा संजय चौधरी,सत्यवान दादा सुर्यवंशी,सुनिल तळेकर(जेऊर), बिभिषन तात्या देशमुख,अच्युत तळेकर आदीजन होते.
या कार्यक्रमात कु. सनिका तळेकर हिने जिजाऊ गीत सादर केले.जेष्ठ व्यक्ती ग.भा.हौसाबाई(आक्का)तळेकर यांचा सन्मान करण्यात आला.सुत्रसंचलन सुनील तळेकर (जेऊर) यांनी केले. आभार सर्जेराव बिचितकर यांनी मांडले. त्यानंतर भोजनाने कार्यक्रमांची सांगता. यावेळी केम परिसरातील अनेकांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली.
देशी गाईंचे तसेच त्यांच्या शेणाचे, गोमुत्राचे महत्व लोकांना समजावे यासाठी प्रामाणीक प्रयत्न आज गोसेवक परमेश्वर तळेकर हे करत आहेत ही काळाची गरज ठरणार आहे.
–प्रा डॉ संजय चौधरी, भारत महाविद्यालय, जेऊर