चळवळीत निस्वार्थ पणे कार्यरत राहणे हिच नामांतर लढ्यातील शहिदांना मानवंदना – नागेश कांबळे

करमाळा- डाॅ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा लढा हा आंबेडकरी चळवळीच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासात मानाचा लढा आहे. चळवळीत निस्वार्थ पणे कार्यरत राहणे हिच नामांतर लढ्यातील शहिदांना मानवंदना आहे असे प्रतिपादन करमाळा (जि. सोलापूर) येथील बहुजन नेते नागेश कांबळे यांनी केले.
डाॅ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन व लढ्यातील शहिद भिमसैनिकांना मानवंदना देण्याचा कार्यक्रम आरपीआय (आ) व नागेशदादा कांबळे मित्र परिवाराच्या वतीने डाॅ आंबेडकर पूतळा येथे आयोजित करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी नामांतर लढ्यातील शहिदांचे फोटो तसेच डाॅ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ प्रवेशद्वाराचा फोटो असलेला मोठ्ठा बॅनर लक्ष वेधून घेत होता. यावेळी मातंग एकता आंदोलन युवराज जगताप,बनसोडे सर,भिमराव कांबळे आरपीआय यूवक जिल्हाध्यक्ष यशपाल कांबळे यांची भाषणे झाली. ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव भोसले, प्रफुल्ल दामोदरे यांनी नामांतर लढ्याचा इतिहास सांगितला. शाहीर बन्सी कांबळे यांनी देखील मानवंदना दिली. या कार्यक्रमास शहर व परिसरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.