संत तुकोबारांचा विचार व जिजाऊंचा आदर्श यांची जपणूक केली तरच समाजाची नैतिक अधोगती थांबेल - विजय महाराज गवळी - Saptahik Sandesh

संत तुकोबारांचा विचार व जिजाऊंचा आदर्श यांची जपणूक केली तरच समाजाची नैतिक अधोगती थांबेल – विजय महाराज गवळी

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : सत्याची कास धरून संत तुकोबारायांच्या विचारांची आणि राजमाता जिजाऊंच्या आदर्शाची जपणूक केली तरच समाजाची नैतिक अधोगती थांबेल असे प्रतिपादन विजय महाराज गवळी यांनी मांजरगाव ता.करमाळा येथे बोलताना केले.
मांजरगाव ता.करमाळा येथे ग्रामपंचायत व भजनी मंडळ यांच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती उत्सवानिमित्त संभाजीनगर येथील प्रबोधनकार विजय महाराज गवळी यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते या कीर्तनात विजय महाराज गवळी बोलत होते.

मांजरगाव ग्रामपंचायतीमध्ये ग्रामस्थांनी सर्व महिला सदस्यांची निवड केली आहे. महिला सक्षमीकरणासाठी ग्रामस्थांनी उचललेले हे पाऊल अत्यंत कौतुकास्पद असून हे जिजाऊंना केलेले आगळे वेगळे अभिवादन असल्याचे सांगून विजय महाराज म्हणाले की, ‘बोले तैसा चाले त्याची वंदीन पाऊले’ ही जगद्गुरू तुकाराम महाराजांची सत्यनिष्ठा
असलेला एकसंध समाज निर्माण करण्यासाठी व त्यासाठी सर्वस्व समर्पणाची तयारी असलेल्या दोन आदर्श छत्रपतीची जडण-घडण जिजाऊंनी केली.

करमाळा पं.सं.च्या माजी सदस्य सौ.माया सुनील तळेकर,कोंढेज ग्रा.पं.च्या सरपंच सौ. अश्विनी गणेश सव्वाशे, मांजरगाव ग्रा.पं.च्या लोकनियुक्त महिला सरपंच सौ,स्वाती संतोष पाटील व उपस्थित महिला ग्रा.पं.सदस्यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिजाऊ वंदना पाठ करणाऱ्या मुलींचा विजय महाराज गवळी यांची पुस्तके देऊन सन्मान करण्यात आला.

या जयंती उत्सवासाठी मराठा सेवा संघाचे माजी अध्यक्ष सचिन काळे, उमरड चे माजी सरपंच संदीप मारकड,रिटेवाडीचे सरपंच प्रतिनिधी किशोर रिटे,पोंधवडीचे मा.सरपंच रघुनाथ दुकानदार,उंदरगावचे सरपंच हनुमंत नाळे,हरिभाऊ कांबळे भाऊसाहेब, संतोष कांबळे,नारायणआबा पाटील मित्रमंडळाचे अध्यक्ष अंगद गोडगे,मकाई सह.साखर कारखान्याचे संचालक संतोष पाटील,प्रा.डाॅ. संजय चौधरी आदी मान्यवरांसह महिला व नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!