चोरीची वाळू पकडली – ५ लाख २५ हजाराचा ऐवज जप्त..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : कर्जतकडून करमाळ्याकडे जाणाऱ्या ट्रक मधून चोरीची वाळू जात असताना पोलीसांनी पकडली आहे. हा प्रकार ७ जानेवारीला पहाटे साडेपाच वाजता घडला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमोल बापूराव जगताप यांनी फिर्याद दिली आहे.

त्यात त्यांनी म्हटले आहे, की कर्जतकडून एक सहाचाकी ट्रक मधून चोरीची वाळू येत असल्याची माहिती समजली होती. त्यानूसार आम्ही पोलीस कर्मचारी व पंच लिंबेवाडी फाट्याजवळ थांबलो असता सहाचाकी ट्रक क्र. एमएच १४ बीजे २९०७ हा भरधाव वेगात जाताना आढळला. त्यास आडवून तपासणी केली असता त्यात २५ हजार रू. किंमतीची अडीच ब्रास वाळू सापडली आहे. या प्रकरणी ट्रकचालकाविरूध्द गुन्हा दाखल केला असून पाच लाख किंमतीचा ट्रक व २५ हजाराची वाळू जप्त व करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण साने हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!