राजमाता जिजाऊंची 425 वी जयंती उत्साहात - 89 रक्तदात्यांनी केले रक्तदान.. - Saptahik Sandesh

राजमाता जिजाऊंची 425 वी जयंती उत्साहात – 89 रक्तदात्यांनी केले रक्तदान..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : कुंभेज (ता.करमाळा) येथे शिवस्फूर्ती समूह सोलापूर जिल्हा यांचेवतीने राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची 425 वी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यामध्ये 89 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

जयंतीचे औचित्य साधत भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केल्याचे शिवस्फूर्ती समूहाचे जिल्हा अध्यक्ष शिवश्री अनिल कादगे यांनी सांगितले. या प्रसंगी जि.प.प्राथमिक शाळा पोफळजच्या शिक्षिका रेखा साळुंके या कार्यक्रमाच्या अध्यक्ष तर प्रमुख पाहुणे म्हणून कुंभेजचे उपसरपंच संजय तोरमल , माजी सैनिक संघटनेचे तालुकाअध्यक्ष मेजर आक्रुर शिंदे, नौदल रिटा.मेजर बिमिषण कन्हेरे, पक्षीमित्र कल्याणराव साळुंके, पोफळजचे उपसरपंच बिभिषण गव्हाणे उपस्थित होते. ज्योतिर्लिंग मंगल कार्यालय, कुंभेज फाटा येथे या समारंभाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रारंभी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाच्या अध्यक्षा रेखा साळुंके यांनी केले. त्यानंतर मान्यवरांसह उपस्थित सर्वांकडून सामूहिक जिजाऊ वंदना गायन करण्यात आले.

या कार्यक्रमास कुंभेजचे उपसरपंच, शिवश्री संजय तोरमल, सैनिक संघटनेचे तालुका अध्यक्ष मेजर अक्रूर शिंदे, नौदल से.नि. सूभेदार मेजर बिभिषन कन्हेरे साहेब , पक्षीमित्र कल्याणराव साळुंके सर, पोफळजचे उपसरपंच बिभिषण गव्हाणे, शिवश्री अनिल कादगे, विदर्भ कोकण ग्रा.बँकचे गणेश शिंदे, आण्णासाहेब भोसले, शिवभक्त बाळासाहेब तोरमल, कुमार कादगे, ऋषीकेश नलवडे, गुरूदास सूर्वे, महावीर भोसले,अशोक होशिंग, विजय शिंदे सर, ऋषीकेश भोसले , रमेश काळे, प्रशांत पवार, श्री.अवताडे, वैभव कादगे, महेश तोरमल, अमोल मुटके सर, श्रीराम शिंदे, रवि काटे, सुदेश माने, प्रविण काटे,रामहारी तोरमल, हर्षद जाधव, हरी शिंदे, प्रज्ञेश गायकवाड,तसेच कुंभेज सह पोफळज व परिसरातील रक्तदाते तसेच शिवप्रेमी ग्रामस्थ आवर्जुन उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवभक्त बाळासाहेब तोरमल यांनी केले तर प्रमुख पाहुणे, उपस्थित मान्यवर व सर्व रक्तदात्यांचे शिवस्फूर्ती समूहाचे जिल्हा अध्यक्ष, व ज्योतिर्लिंग मंगल कार्यालयाचे मालक शिवश्री अनिल कादगे यांनी मनस्वी आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!