करमाळा शहरात प्रथमच नवभारत स्कूलमध्ये डायनॅमिक मेमरी वर्कशॉप संपन्न..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : श्री गिरधरदासजी देवी प्रतिष्ठान संचलित नवभारत इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये दिनांक 27 नोव्हेंबर रोजी डायनामिक मेमरी वर्कशॉप संपन्न झाले. हे वर्कशॉप घेण्यासाठी औरंगाबाद होऊन स्वाती गुजराती या आल्या होत्या.
करमाळा शहरात प्रथमच अशा स्वरूपाचे वर्कशॉप घेण्यात आले होते. सर्वप्रथम पाहुण्यांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुनिता मोहिते यांनी केले. या वर्कशॉप मध्ये इयत्ता तिसरी ते इयत्ता दहावी मधील मुलांनी आपला सहभाग नोंदवला होता. वर्कशॉप मध्ये स्वाती गुजराती यांनी मोठी माहिती छोट्या छोट्या ट्रिक मध्ये कशी लक्षात ठेवावी याविषयी सांगितले तसेच त्यांनी आपल्या देशात आत्तापर्यंत होऊन गेलेले पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांची यादी क्रमाने कशी लक्षात ठेवावी.
आपल्या देशातील विविध राज्यांच्या राजधानी कशा लक्षात ठेवाव्यात. नकाशा मधील विविध स्थाने कशी लक्षात ठेवावी तसेच गणितामधील सोप्या सोप्या ट्रिक्स त्यांनी मुलांना शिकवल्या. मुलांनीही या वर्कशॉपला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. हे वर्कशॉप दहा ते तीन या वेळेत घेण्यात आले होते. शाळेचे अध्यक्ष श्री कन्हैयालालजी देवी सर व शाळेच्या सर्वेसर्वा सौ सुनीता देवी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हे वर्कशॉप घेण्यात आले होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ अश्विनी क्षीरसागर मॅडम यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर स्टाफ उपस्थित होता.