उत्तरेश्वर हायस्कूलच्या पाच विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेसाठी निवड
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या वतीने आयोजित केलेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेतुन केममधील पाच विद्यार्थ्यांची निवड पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.
ही स्पर्धा २६ नोव्हेंबरला यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा येथे पार पडली. हे सर्व पाच विद्यार्थी केम येथील उत्तरेश्वर हायस्कूलचे आहेत. ही स्पर्धा लहान व मोठा गट अशी विभागून पार पडली.
यामध्ये 14 वर्षे वयोगटामधून वैष्णवी अविनाश येवले (द्वितीय), सिद्धी सचिन रणशृंगारे (तृतीय) तर १७ वर्षे वयोगटामधून विनायक शाम कळसाईत(प्रथम), विश्वजित धनंजय ताकमोगे(तृतीय), श्रावणी मनोजकुमार सोलापुरे(पाचवी) या सर्व विध्यार्थ्यांची सोलापूर येथे होणाऱ्या जिल्हा स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक अमोल तळेकर यांनी मार्गदर्शन केले.