करमाळा विधानसभा मतदारसंघात कुर्डूमध्ये सर्वात कमी १ % तर ढोकरीत सर्वात जास्त ८३ % मतदान
करमाळा (संदेश प्रतिनिधी) करमाळा विधानसभा मतदारसंघात करमाळा तालुक्यातील ११८ गावांसह माढा तालुक्यातील ३६ गावांचा समावेश आहे. या मतदारसंघात एकूण ३४२ मतदान केंद्र आहेत. ७ मे ला झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी करमाळा विधानसभा मतदारसंघातील कुर्डू (ता. माढा )येथे सर्वात कमी म्हणजेच एक (1%) टक्का मतदान झाले आहे तर करमाळा तालुक्यातील ढोकरी येथे ८३ टक्के मतदान झालेले आहे. करमाळा शहरात ५५% मतदान झाले आहे.
Related News – माढा लोकसभा मतदारसंघात फलटणमध्ये सर्वात जास्त तर करमाळ्यात सर्वात कमी मतदान
करमाळा विधानसभा मतदारसंघात एकूण १ लाख ६६ हजार ८०३ पुरुष मतदार असून १ लाख ५१ हजार ११४ महिला मतदार आहेत तर ११ इतर मतदार आहेत. यापैकी १ लाख ३४४ (६०.१६%) पुरुष मतदारांनी मतदान केले असून ७७ हजार १६८ (५१.०७%) महिला मतदारांनी तर इतर ४ जणांनी मतदान केले. असे एकूण १ लाख ७७ हजार ५१६ एवढे मतदान करमाळा विधानसभा मतदारसंघात झाले आहे.
Related News – माढा लोकसभा मतदारसंघात फलटणमध्ये सर्वात जास्त तर करमाळ्यात सर्वात कमी मतदान