करमाळ्यात 7 जानेवारीला पत्रकारांची ‘एक दिवसीय कार्यशाळा’ – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे हस्ते उद्घाटन..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा पत्रकार संघाच्यावतीने शनिवार दिनांक 7 जानेवारीला एक दिवशीय पत्रकारांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यशाळेचे उद्घाटन सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे करणार आहेत, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आयबीएन लोकमतचे अँकर विलास बडे उपस्थित राहणार आहेत.
करमाळा शहरातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या ‘विजयश्री सभागृहात’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यशाळेत डॉक्टर प्राध्यापक महेंद्र कदम ‘ग्रामीण पत्रकारांपुढील आव्हाने’ तर डॉक्टर प्रा.प्रदीप मोहिते ‘आमच्या समाजाच्या पत्रकारांकडून अपेक्षा’ या विषयावर भाष्य करणार आहेत तसेच साम टीव्ही चे माजी संपादक राजेंद्र हुजे ‘पत्रकारांचीसामाजिक जबाबदारी’ यावर व्याख्यान देणार आहेत, डॉ.ॲड.बाबुराव हिरडे हे ‘सोशल मीडियाचे पत्रकारितेतिल महत्व’ या विषयावर बोलणार आहेत तर मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे ‘पत्रकारितेच्या माध्यमातून रुग्णसेवा’ या विषयावर मार्गदर्शन करणार असून, आयबीएन ची टीव्ही अँकर विलास बडे पत्रकार करिअर या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
या पत्रकारांच्या कार्यशाळेसाठी करमाळा, माढा, जामखेड, कर्जत या भागातील सर्व पत्रकारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करमाळा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे यांनी केले आहे. तसेच ज्या तरुण-तरुणींना पत्रकारितेमध्ये करिअर करायचे आहे, अशा विद्यार्थ्यांनीही या कार्यशाळेत सहभागी व्हावे असेही आवाहन करमाळा तालुका पत्रकार संघाच्यावतीने करण्यात आले आहे.