कात्रज येथे आमदार शिंदे यांचे हस्ते म्हसोबा मंदिर सभामंडप भुमीपूजन व विविध विकासकामांचे उद्घाटन
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : कात्रज (ता. करमाळा) येथे आज (ता. २१) म्हसोबा यात्रेनिमित्त गावातील विविध विकासकामाचे भुमीपूजन व उद्घाटन आमदार संजयमामा शिंदे यांचे हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बारामती ॲग्रोचे व्हा.चेअरमन सुभाष गुळवे हे होते.
यावेळी बोलताना आमदार शिंदे म्हणाले, की करमाळा तालुक्यात ज्यावेळी माझी राजकीय सुरूवात झाली त्यावेळी या गावात माझाही एकही कार्यकर्ता नव्हता किंवा कोणाशीही संपर्क नव्हता. परंतु पहिल्यावेळीस मी जेव्हा आमदारकीला उभा राहिलो त्यावेळी या गावातून मला बाळकृष्ण सोनवणे व त्यांचे सहकाऱ्यांचे सहकार्य मिळाले. त्यावेळी त्यांनी माझ्याकडे कोणतीही अपेक्षा व्यक्त केली नव्हती. निरपेक्षतेने या गावाने मला आत्तापर्यंत सहकार्य केले आहे. त्यामुळे या गावातील विकासकामे करणे हे माझे कर्तव्य आहे म्हणून मी गावातील विकासकामाला प्राधान्य दिले आहे. या पुढील काळात कात्रज गावाला मिळणाऱ्या दोन किमी रस्त्याचे काम त्वरीत मार्गी लावू; असे आश्वासन दिले.
कात्रज येथे आज २५१५ योजने अंतर्गत श्री साईबाबा मंदिर सभामंडप उद्घायन, जलजीवन मिशन योजने अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन, दलित वस्तीतील पूर्ण झालेल्या कामांचे उद्घाटन व भुमीपूजन तसेच मसोबा मंदिर येथे सभामंडपाचे भुमीपूजन आमदार शिंदे यांचे हस्ते झाले. यावेळी चर्मकार समाजातील जास्तीत जास्त बांधव उपस्थित होते.
यावेळी आदिनाथचे माजी अध्यक्ष वामनराव बदे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, सुभाष गुळवे, पंचायत समितीचे माजी सदस्य विलास पाटील, मकाईचे संचालक बाळासाहेब पांढरे, जिंतीचे युवक नेते ॲड. नितीनराजे राजेभोसले, माजी सरपंच उदय ढेरे, डॉ. गोरख गुळवे, बाजार समितीचे संचालक नागनाथ लकडे, आदिनाथचे माजी संचालक किरण कवडे, सुहास गलांडे, शंकर कवडे, दत्तात्रय धायगुडे, सोमनाथ पाटील, जनार्धन लकडे, चंद्रकांत लकडे, आबासाहेब लकडे, कुंडलिक लकडे, सुर्यकांत मारकड, गंगाराम वाघमारे, विवेक येवले, उद्योजक भरतभाऊ आवताडे, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब मोरे, सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण माने, ॲड. गिरंजे, डॉ. राहुल कोळेकर, आदिनाथचे माजी संचालक राजेंद्र धांडे, रामवाडीचे सरपंच गौरव झांजुर्णे, माजी सरपंच हनुमंत पाटील, ॲड. अजित विघ्ने, सुजित बागल, सतीश शेळके, संजयकुमार भोसले, तानाजी झोळ, केत्तूरचे दादासाहेब निकम आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन श्री गुरु रविदास विश्व महापीठाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष व उद्योजक बाळकृष्ण सोनवणे व सरपंच मनोहर हंडाळ यांनी केले होते. उपस्थितांचे स्वागत व आभार बाळकृष्ण सोनवणे यांनी केले. कात्रज परिसरात तीन तास वेळ देवून आमदार शिंदे यांनी नागरीकांच्या समस्या जाणून घेतल्या.