१ ऑक्टोबर पासून देवीचा माळ येथे ‘कमलाई फेस्टिवल’ सुरू, रांगोळी व नृत्य स्पर्धेचे आयोजन
करमाळा ( संदेश प्रतिनिधी) : नवरात्रोत्सव कालावधी मध्ये आयोजित करण्यात येत असलेले ‘कमलाई फेस्टिवल’ कोरोनामुळे दोन वर्ष आयोजित करता आले नव्हते.यावर्षी सर्व बंधने शिथिल झाल्याने यावर्षी कमलाई फेस्टिवलचे आयोजन करण्यात आलेले आहे अशी माहिती राजे राव रंभा तरुण मित्र मंडळ देवीचामाळ यांनी दिली.
आज (१ ऑक्टोबर) पासून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये १ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ ते ७ यावेळेत रांगोळी स्पर्धा (खुला गट) या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम बक्षीस दीड हजार रुपये, दुसरे बक्षीस एक हजार व तृतीय बक्षीस सातशे रुपये देण्यात येणार आहे.
एक ऑक्टोबर रोजी रात्री 7 ते 10 या दरम्यान डान्स स्पर्धेचे (वयोगट पाच ते बारा) आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम बक्षीस ५५५५ रुपये, दुसरे बक्षीस ३३३३ व तृतीय बक्षीस २२२२ रुपये देण्यात येणार आहे.
दोन ऑक्टोबर रोजी रात्री 7 ते 10 या दरम्यान डान्स स्पर्धेचे ( खुला गट ) आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम बक्षीस ५५५५ रुपये, दुसरे बक्षीस ३३३३ व तृतीय बक्षीस २२२२ रुपये देण्यात येणार आहे.
तीन ऑक्टोबर रोजी रात्री 7 ते 10 या दरम्यान डान्स स्पर्धेचे ( खुला गट ) आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम बक्षीस ५५५५ रुपये, दुसरे बक्षीस ३३३३ व तृतीय बक्षीस २२२२ रुपये देण्यात येणार आहे.चार ऑक्टोबर रोजी रात्री 7 ते 10 या बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम ग्रामपंचायत वाहन पार्किंग स्थळ, देवीचामाळ करमाळा येथे आयोजित केला आहे.तरी करमाळा तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग व उपस्थित राहावे असे आवाहन राजेरावरंभा तरुण मंडळाने केले आहे.