'मकाई' चा बाॅयलर अग्निप्रदिपन संपन्न - Saptahik Sandesh

‘मकाई’ चा बाॅयलर अग्निप्रदिपन संपन्न

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : भिलारवाडी (ता.करमाळा) येथील श्री.मकाई सहकारी साखर कारखाना लि.गळीत हंगाम सन २०२२-२०२३ चा बाॅयलर अग्निप्रदिपन विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांच्या हस्ते संपन्न झाला.

याप्रसंगी श्री.मकाई कारखान्याची २०२१-२०२२ ची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली याप्रसंगी सोलापूर जिल्ह्या बॅंकेच्या संचालिका व बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल, मकाईचे चेअरमन, बागल गटाचे नेते दिग्विजय बागल, संचालक बाळासाहेब पांढरे, कार्यकारी संचालक हरिश्चंद्र खाटमोडे,श्री.अदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रा.शिवाजीराव बंडगर व आजी माजी संचालक मंडळ, बागल गटाचे पदाधिकारी, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी वृंद,सभासद,उस उत्पादक,वाहतूक व तोडणीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!