सुजिततात्या बागल यांची सरपंच परिषदेच्या तालुका समन्वयकपदी निवड

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : मांगी (ता.करमाळा) येथील सामाजिक कार्यकर्ते आमदार संजयमामा शिंदे यांचे समर्थक सुजिततात्या बागल यांची सरपंच परिषदेच्या तालुका समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

गेल्या अनेक वर्षापासून मांगी येथील सामाजिक कार्यात अग्रेसर त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रात आमदार संजयमामा शिंदे यांचे समर्थक म्हणून जनतेच्या अडीअडचणी सोडवत आहेत, तसेच ते मांगी ग्रामपंचायतचे सदस्य आहेत, या माध्यमातून मांगी गावासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलेला आहे, रस्ते ,पथदिवे हायमॅक्स, विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी निधी पाणीपुरवठा निधी, आमदार संजयमामा शिंदे यांच्या आमदार निधीतून मांगीसह इतर गावांनाही सुजीत बागल यांचे प्रयत्नातून निधी देण्यात आलेला आहे.

त्यामुळे सुजित बागल यांचे कार्य पाहता करमाळा येथे महाराष्ट्र राज्य सरपंच परिषद मुंबई यांच्यातर्फे सरपंच परिषदेच आयोजन करण्यात आले होते, यानिमित्त सुजित बागल यांची सरपंच परिषद प्रदेश सरचिटणीस ॲड. विकास जाधव व सरपंच परिषद महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांचे हस्ते निवडीचे पत्र देवून तालुका सरपंच परिषद समन्वयकपदी निवड करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!