जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांनी दिल्या केम परिसरातील संस्था व उद्योगांना भेटी
केम(प्रतिनिधी/संजय जाधव) : केम तालुका करमाळा येथील जि.प. शाळा बिचितकर वस्ती नं १ व २ या दोन्ही शाळांनी गुरुवारी( 8 डिसेंबर रोजी) संयुक्त पणे ‘विद्यार्थी परिसर भेट’ हा उपक्रम आयोजित केला होता.
या उपक्रमांतर्गत विदयार्थाना प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळावे यासाठी केम मधील बॅंक ऑफ महाराष्ट्र, केम पोलीस स्टेशन, केम ग्रामपंचायत, केम पाणी पुरवठा योजना अंतर्गत असणारे जलशुद्धीकरण केंद्र, केम पोस्ट ऑफिस, केम रेल्वे स्टेशन, ट्रॅक्टर ट्रॉली निर्मिती कारखाना, वीट उद्योग, कुंकू निर्मिती कारखाना आदी क्षेत्रांना भेटी दिल्या.
या संस्थांचे, उद्योगांचे कामकाज कसे चालते ते विद्यार्थ्यांना प्रत्यक्षपणे पाहता आले. तसेच त्या त्या ठिकाणातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना कामकाजा बद्दलची माहिती दिली. या वेळी विद्यार्थ्यांनी कुंकू कारखान्यातील कामगारांना प्रश्न विचारले. कारखान्याची पाहणी केल्यावर कुंकू कारखानदार सुभाष दादा कळसाईत यांनी विद्यार्थ्यांना स्नेहभोजन दिले. या उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
या भेटीचे आयोजन मुख्याध्यापक सतीश कळसाईत व मुख्याध्यापक मंगेश सोलापूरे तसेच सहशिक्षिका अरुणा सोनवणे, सहशिक्षक गौतम फरतडे यांनी केले.
या उपक्रमासाठी दोन्ही शाळांच्या शाळा व्यवस्थापन समितीने सहकार्य केले. केंद्र प्रमुख महेश कांबळे यांनी व विद्यार्थ्यांनच्या पालकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.