करमाळा येथील मुस्लिम समाजाने दिला मोहिते-पाटील यांना जाहीर पाठिंबा – विविध मागण्यांचे दिले पत्र

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : आज (दि.५ मे) सकल मुस्लीम समाज करमाळा यांच्या वतीने माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांना मुस्लिम समाजाच्या वतीने विविध मागण्या व ते सोडविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केला पाहिजे यासाठी सकल मुस्लीम समाज करमाळा यांच्या वतीने विविध मागण्या असणारे पत्र हस्ते सौ शीतल देवी धैर्यशील मोहिते पाटील यांना देण्यात आले.
यावेळी करमाळा शहरातील मुस्लीम समाजातील जेष्ठ मार्गदर्शक नेते व माजी नगराध्यक्ष हाजी युसुफ भाई नालबंद व माजी उपनगराध्यक्ष पैलवान अहमद चाचा कुरेशी , मौलाना मोहसीन, माजी नगरसेवक नजीर अहमद भाई कुरेशी, माजी नगरसेवक अस्लम वस्ताद कुरेशी,मौलाना कादर,जमीर भाई सय्यद ( विश्वस्त जामा मस्जिद करमाळा) आझाद भाई शेख ( उपाध्यक्ष करमाळा शहर पवार साहेब गट ), जहांगीर भाई बेग, मजहर नालबंद सादिक भाई नालबंद, मुस्तकीम भाई पठाण, कय्यूम भाई शेख आदीजनाच्या हस्ते हे पत्र देण्यात आले.
यावेळी सौ शीतल देवी मोहिते पाटील यांनी ठोस आश्वासन दिले की मुस्लीम समाजाला विकासाच्या दृष्टीने इतर समाजातील घटका बरोबर योग्य प्रवाहात आवश्यक सर्वपोतरी प्राधान्य देऊन शंभर टक्के सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्याच बरोबर इतर मागण्यांचाही विचार करून त्याही सोडविल्या जातील असे आश्वासन दिले आहे.
यावेळी मौलाना मोहसीन यांनी मुस्लीम समाजातील विविध प्रश्नांवर व अडी अडचणी सांगुन मुस्लीम समाजाला शैक्षणिक व आर्थिक उन्नती व आरक्षण व संरक्षण या सर्व बाबी वर विचार व्यक्त करुन त्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करावा असे आवाहन केले आहे.
तसेच जमीर भाई सय्यद व आझाद भाई शेख यांनी बोलताना सांगितले की आजपर्यंत मुस्लीम समाजाला विकासाच्या दृष्टीने वंचित ठेवले आहे त्यांचा निवडणूक होई पर्यंत प्राधान्याने विचारपुस करता त्यांना नेहमी गृहीत धरले जाते परंतु निवडणुका झाल्यानंतर त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी व विकास करण्याच्या बाबतीत जाणुन बुजुन डावलले जात आहे त्यामुळे यापुढे जो मुस्लीम समाजाला सोबत घेऊन काम करेल त्यांचे प्रश्न सोडवेल अशा नेतृत्वालाच मुस्लीम समाज साथ देणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी असे सांगितले आहे.
यावेळी सकल मुस्लीम समाजातील अकबर भाई झरेवाले ( काॅन्ट्रक्टर )बिलाल भाई मदारी, जिशान कबीर, बागायतदार मंजूर भाई शेख,अलीम भाई खान, ईकबाल भाई शेख, जहांगीर भाई शेख, कलीम भाई शेख, बायुभाई कुरेशी, रुस्तुम भाई कुरेशी,व शेकडो मुस्लीम समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.
मुस्लिम समाजाच्या वतीने शीतल देवी धैर्यशील मोहिते पाटील यांना पत्र देऊन खालील मागण्यांचे पत्र दिले –
- 1) मराठा समाज, धनगर समाज, मुस्लीम समाज यांना आरक्षण मिळण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या कडे आवाज उठवुन व आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करावा.
- 2) भारतीय संविधानाच्या घटनाविरोधी बदला संदर्भात संसदेत वेळोवेळी आवाज उठवुन संविधानाचे संरक्षणास प्राधान्य द्यावे
- 3) मुस्लीम समाजातील युवकांना उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज किंवा उद्योग धंदे सुरू करण्यासाठी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून किंवा इतर बॅंकेच्या कडुन कर्ज उपलब्ध करून देणे.
- 4) करमाळा मुस्लीम समाजातील विद्यार्थ्यांसाठी करमाळा शहरात वसतिगृह सुरू करणे.
- 5) करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागातील मुस्लीम समाजातील कब्रस्तानातसाठी जागा नाही सरकारकडून जागा उपलब्ध करणे
- 6) अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरती मार्गदर्शन,एम पी एस सी साठी अभ्यासिका उभारण्यासाठी निधी देण्यात यावा.
- 7) करमाळा एम आय डी सी लवकरात लवकर सुरू करुन. एम आय डी सी मधील जागा उद्योग धंद्यासाठी अत्यंत कमी अशा बाजार भावात उपलब्ध करून देणे व एम आय डी सी मध्ये चांगले प्रकारच्या कंपन्या किंवा उद्योग धंदे आणुन . करमाळा तालुक्यातील बेरोजगार तरुणांना नौक-यात प्रथम प्राधान्य देण्यात यावे.
- 8) जेऊर – आष्टी रेल्वे मार्ग प्रस्तावित मंजुरी असुन या रेल्वे मार्गाचे सर्व अडथळे दुर करुन करमाळा शहराच्या जवळ रेल्वे स्थानक असावे.
- 9) करमाळा तालुक्यातील मांगी तलावाचा कुकडी प्रकल्पात समावेश करुन मांगी तलावाचा साठवणूक क्षमता वाढवुन आता पर्यंत न पोहोचलेल्या भागात पाणी पोहचवण्यासाठी कॅनालची कामे करावी.
- 10 ) रिटेवाडी उपसा सिंचन योजना मंजूर करुन पन्नास गावातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवावा .


