कै.हनुमंतराव गायकवाड महिला दूध संस्थेच्यावतीने सभासदांना कॅटली व भेटवस्तू वाटप..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : देवळाली (ता.करमाळा) येथे आज दिपावली निमित्त कै.हनुमंतराव गायकवाड महिला दूध संस्था व विश्वजित मिल्क & मिल्क प्रोडक्ट यांचे वतीने संस्थेच्या सर्व सभासदांना कॅटली व गिफ्ट वाटप कार्यक्रम विकासप्रिय आमदार मा.संजयमामा शिंदे व सोनाई दूध संस्था परिवाराचे अध्यक्ष मा.दशरथदादा माने यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र केसरी पै.मा.चंद्रहास निमगीरे,मा.जगदाळे, माजी जि.प.सदस्य, उध्दवदादा माळी, तानाजी बापू झोळ, भरतभाऊ आवताडे, महाविर साळुंखे, सुजीततात्या बागल,वीटचे सरपंच उदय ढेरे, मानसिंग खंडागळे, देवळाली गावचे माजी सरपंच आशिष गायकवाड, संतोष गायकवाड, संस्थेचे चेअरमन बाळासाहेब गायकवाड, संदीप गायकवाड, सरपंच गहिनीनाथ गणेशकर, उपसरपंच धनंजय शिंदे, अर्जून जगताप, संजय कानगुडे, रामभाऊ रायकर, बंडूकाका शेळके ,प्रकाश कानगुडे, पोपट बोराडे, बापू गुंड, तात्यासाहेब जाधव,बाळासाहेब गोरे (गुरुजी), राजेंद्र घळके तसेच संस्थेचे सभासद,चेअरमन व ग्रामस्थ उपस्थित होते.