मांजरगाव ग्रामपंचायतीमार्फत लंपी लसीकरण शिबीर
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : मांजरगाव (ता.करमाळा) ग्रामपंचायतच्यावतीने लंपी या आजाराचे लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. बाळासो चव्हाण यांचे गोठ्यावर मान्यवरांचे हस्ते उद्घाटन केले, गावामध्ये जनावारे एकत्र गोळा न करता प्रत्येकाचे गोठ्यावर जाऊन डॉक्टर लस देणार आहेत संपर्काचा संभाव्य धोका लक्षात घेऊन ही उपाययोजना करण्यात येत आहे.
यावेळी बाळासो चव्हाण , अंकुश चव्हाण, सोपान चव्हाण, आप्पा फराटे, ज्ञानदेव चव्हाण, सागर चव्हाण, अतुल पाटील, साधु पाटील, मामु खरात, राजु मोरे विद्यमान सरपंच प्रतिनिधी श्री महेश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात फैलावत असलेला जनावरा मधील आजार म्हणजे लंपी या आजाराने अनेक भागात पशुधन धोक्यात आलेले आहे व शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये ही लस उपलब्ध नसल्याने सरकारी यंत्रणेकडून लसीकरण केले जात नाही अनेक गावांमध्ये लंपी सदृश्य लक्षणे असलेली जनावरे पाहायला मिळत आहे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासकीय लसीची वाट न पाहता खाजगीतुन लस उपलब्ध करून गावातील सर्व जनावरांना ती लस दिली जावी व आपल्या गावातील पशुधन सुरक्षित राहावे यासाठी ग्रामपंचायत मांजरगाव ने ही लस खरेदी केली असून उद्या ती लस प्रत्येक जनावरांना दिली जाणार आहे.
गावामध्ये मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय केला जात असून जनावरांची संख्या जास्त आहे त्या दृष्टीने ही लस प्रत्येक जनावरांना मोफत दिली जाणार आहे तरी प्रत्येक शेतकऱ्यांनी या शिबिराचा लाभ घेऊन आपल्या जनावरांना लस टोचून घ्यावी अशी विनंती ग्रामपंचायत च्या आदर्श सरपंच सौ.गायत्री कुलकर्णी , उपसरपंच आबासो चव्हाण , सर्व सदस्य यांनी संतोष पाटील यांचे मार्गदर्शनाने केली आहे.
शासकीय लस उपलब्ध होण्यास उशीर झाला तर या आजारामुळे पशुधन धोक्यात येऊ शकते आणि हा संभाव्य धोका हा शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करणारा होऊ शकतो म्हणून ग्रामपंचायतीने स्वनिधीतुन लस उपलब्ध करून ती सर्व जनावरांसाठी पशुवैद्यकीय दवाखाना उमरड चे डॉ.पवार तसेच स्थानिक प्रॅक्टिस करणारे सर्व डॉक्टरांची टीम लसीकरणास उपस्थीत राहणार आहे .तरी सर्वांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आपल्या पशुधनाची काळजी आपणच घ्यावी. आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्राम पंचायत च्या वतीने हे आरोग्य शिबीर घेण्यात येत आहे.