माजी नगराध्यक्ष हरिभाऊ पांडुरंग जगताप यांचे निधन - Saptahik Sandesh

माजी नगराध्यक्ष हरिभाऊ पांडुरंग जगताप यांचे निधन

Haribhau Pandurang Jagtap Karmala

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व माजी आमदार कै.कर्मवीर अण्णासाहेब जगताप यांचे सुपुत्र हरिभाऊ पांडुरंग जगताप (वय ७८) यांचे काल (ता.१७) रात्री १० वाजताच्या दरम्यान हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली व नातवंडे असा परिवार आहे. हरिभाऊ जगताप यांना तपासणीसाठी बार्शी येथील रुग्णालयात नेण्यात आले होते. दरम्यान त्यांना तिथेच हृदयविकाराचा झटका आला व त्यात त्यांचे निधन झाले.

करमाळा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ॲड.शिवराज जगताप तसेच करमाळा वकील संघाच्या माजी अध्यक्षा, माजी नगरसेविका ॲड.लता पाटील यांचे ते वडील होते. तर कमलाभवानी ट्रस्टचे सचिव अनिल पाटील यांचे ते सासरे होते. त्यांचा अंत्यविधी आज (ता.१८) सकाळी १० वाजता अहमदनगर रोड वरील त्यांच्या शेतामध्ये होणार आहे.

Saptahik Sandesh| former mayor karmala Nagar palika Haribhau Pandurang Jagtap passed away | Anil Patil | Shivraj Jagtap | Lata Patil

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!