घरगुती गॅस चारचाकी वाहनात भरताना पकडले रंगेहाथ

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : घरगुती गॅस सिलेंडर मधील गॅस चारचाकी वाहनात बेकायदेशीरपणे भरत असताना एकास पुरवठा अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले आहे. हा प्रकार १५ सप्टेंबरला दुपारी दीड वाजता रंभापूरा भागात घडला आहे. या प्रकरणी करमाळा तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक प्रशांत मनोहर भडकुंबरे यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की करमाळा शहरातील रंभापूर भागात बेकायदेशीररित्या घरगुती गॅस चारचाकी वाहनात भरला जात असल्याची माहिती मिळाल्यावर १५ सप्टेंबरला दुपारी दीड वाजता आम्ही तेथे रेड टाकली असता, आश्रु शिवाजी तांबे (रा. रंभापुरा) हा जातेगाव येथील नजीर अहमद सय्यद यांच्या चारचाकी वाहनात प्लॅस्टीक पाईपव्दारे बेकायदेशीररित्या गॅस भरत असताना आढळून आला आहे. यावेळी गॅसटाकी व प्लॅस्टीक पाईप मोटर जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Sonaraj metal Yash collection advertise

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!