शेटफळ येथील केळी उत्पादक मालामाल - निर्यातक्षम केळीला मिळतोय पंचवीस रुपये किलोचा भाव - Saptahik Sandesh

शेटफळ येथील केळी उत्पादक मालामाल – निर्यातक्षम केळीला मिळतोय पंचवीस रुपये किलोचा भाव

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : शेटफळच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळतोय प्रती किलोला पंचवीस ते सव्वीस रूपयाचा दर निर्यातक्षम केळीचा दर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे, येथील झुंबर पोळ या शेतकऱ्याला चार एकर क्षेत्रावर पंचवीस लाख रुपयांचे उत्पन्न मिळणे अपेक्षीत आहे.

निर्यातक्षम केळीची अशी स्थिती असली तरी थोड्याशा कमी प्रतीच्या केळीला व खोडव्याला स्थानिक बाजारपेठेत अपेक्षित भाव मिळत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. सध्या निर्यातक्षम केळीचा तुटवडा असल्याने सर्वच केळी निर्यात कंपन्यांकडून उपलब्ध केळीचा दर वाढला असून शेटफळ (ता.करमाळा) येथील शेतकरी झुंबर भागवत पोळ यांची केळी आज पंचवीस रुपये दराने सनरिया कंपनीसाठी केळी व्यापारी विष्णू पोळ यांनी पंचवीस रुपये दराने खरेदी केली आहे.

येथील बाळासाहेब रोंगे यांची यांची केळी व्यापारी आशिष पाटील यांनी वंडर बेरीसाठी तर अनिल मारकड विकास जाधव यांच्यासह इतर शेतकऱ्यांची केळी पारस गुंड यांनी इतर कंपनीसाठी सव्वीस रूपये या दराने खरेदी केली आहे.सध्या निर्यातक्षम केळी उत्पादक शेतकऱ्यांना चा़गले दिवस आले आहेत. गेल्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केळी रोपांची टंचाई व खराब हवामानाच्या काळात या शेतकऱ्यांनी केळी लागवड करून मोठ्या कष्टाने हे पिक उभे केले आहे.सध्या करमाळा तालुक्यातील निर्यातक्षम केळीला आखाती देशात मोठी मागणी असल्याने केळी निर्यात कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे.

येथिल झुंबर भागवत पोळ यांची चार एकर केळीची पंचवीस रुपये दराने खरेदी सुरू असुन शंभर टनापेक्षा ज्यास्त उत्पादन मिळून पंचवीस लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे केळी काढणी शुभारंभ प्रसंगी केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने निर्यातदार व प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला यावेळी निर्यातदार प्रतिनिधी संतोष बाबर महाराष्ट्र केळी उत्पादक संघांचे तालुका अध्यक्ष वैभव पोळ लोकविकास फार्मस् प्रोड्यूसर कंपनीचे संचालक गजेंद्र पोळ, नानासाहेब साळूंके, प्रशांत नाईकनवरे, विजय लबडे, महावीर निंबाळकर, यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

सध्या केळी उत्पादन कमी असल्याने करमाळा तालुक्यातील निर्यातक्षम केळीला चांगला दर मिळत असला तरी काही दिवसांत थंडी वाढल्यानंतर चिलींगच्या कारणास्तव निर्यातदार माल रिजेक्ट करतात. यावेळी दर पाडले जातात म्हणून केळीला हमी भाव मिळाला पाहिजे अशी मागणी आमच्या संघटनेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना केली आहे.

– वैभव पोळ तालुका (अध्यक्ष महाराष्ट्र केळी उत्पादक संघ)


आखाती देशांमध्ये सोलापूरच्या केळीला चांगली मागणी असून सध्या शेतकऱ्यांना दरही चांगला मिळत आहे. शेतकऱ्यांनी केळीच्या दर्जा व गुणवत्तेकडे लक्ष दिल्यास निर्यातक्षम केळीला कायम चांगले दर पुढील काळातही मिळतील.यासाठी शेतकऱ्यांनी लागवडीचे व फ्रुटकेअरचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे.

– अमोल महाजन केळी निर्यातदार (अध्यक्ष सनरिया ॲग्रो कंपनी जळगाव )

Banana producers in Shetphal are getting the price of twenty five rupees per kg for exportable bananas | Shetfal News | Karmala News

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!