पत्रकारांच्या कल्याणासाठी शासनाकडे पाठपुरावा करून पत्रकारांना न्याय मिळवून देणार : मंगेश चिवटे
करमाळा / संदेश प्रतिनिधी : पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ असून, समाजाची अविरत निस्वार्थ भावनेने सेवा करणारा प्रमुख घटक असल्याने पत्रकारांच्या कल्याणासाठी राजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाकडे पाठपुरावा करून पत्रकारांना न्याय मिळवून देणार असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक महाराष्ट्र राज्य मा वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी व्यक्त केले.
करमाळा डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकार सन्मान सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते.डिजीटल पत्रकार संपादक संघटना करमाळा यांच्यावतीने मंगेश चिवटे डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतीश भाऊ सावंत यांचा करमाळयाची श्री आई कमलाभवानीची प्रतिमा शाल पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतीश भाऊ सावंत होते यावेळी करमाळा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष दिनेश मडके, करमाळा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे करमाळा डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष दिनेश मडके ज्येष्ठ पत्रकार नासीर कबीर ,वंदे मातरम् पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास घोलप उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना मंगेश चिवटे म्हणाले की बदलत्या परिस्थितीनुसार पत्रकारीतेच्या क्षेत्रात प्रिंट मीडियाच्या बरोबरच डिजिटल मिडिया वेगवान बातमीचे माध्यम बनले आहे.डिजिटल मीडियामुळे समाजात अमुलाग्र बदल झाला असून डिजिटल मीडियाला वेगवान माध्यम म्हणून सध्या लोकमान्यता मिळाली आहे . प्रिंट मीडिया व डिजिटल मीडिया एकाच नाण्याच्या दोन बाजू असून डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने साहेब यांनी पत्रकाराच्या न्याय हक्कासाठी डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या माध्यमातून एक मोठे व्यासपीठ निर्माण करून दिले आहे.
या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पत्रकारांना एकत्रित करण्याचे काम या संघटनेने केले असून सुमारे 15000 पत्रकाराचे संघटन असलेली ही एकमेव संघटना आहे. या संघटनेमार्फत आपणही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्रकारांच्या कल्याणासाठी आर्थिक विकास महामंडळासाठी पाठपुरावा केला होता या महामंडळाची घोषणा झाली आहे. परंतु आर्थिक तरतूद झाली नाही लवकरच शासनाकडे पाठपुरावा करून आम्ही पत्रकारांना श्रमिक पत्रकार म्हणून शासनाच्या सवलती बरोबरच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाप्रमाणेच पत्रकारांना आत्मनिर्भर होण्यासाठी व्यवसाय साठी कर्ज योजना , वैद्यकिय उपचारासाठी कुटुंबकल्याण योजनेखाली दहा लाखापर्यंत पत्रकारांना मेडिक्लेम देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून मंजूर करून घेणार आहोत. याबरोबरच पत्रकारांच्या मुलांना शैक्षणिक सवलती बरोबरच शिष्यवृत्ती देण्याचाही प्रस्ताव शासनाकडे देण्यात येणार आहे . समाजाची निरपेक्ष सेवा करणारा पत्रकार वयोवृद्ध झाल्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारची पेन्शन नाही समाज राजकीय पुढारी शासन या सर्वांचे या घटकाकडे दुर्लक्ष झाले आहे.सगळया जगाचा चिंता करणारा त्यांच्या कल्याणासाठी झटणारा घटक दुर्लक्ष राहिल्यामुळे त्यांचे जीवन संघर्षमय झाले असून त्यांचे जीवन सुखी समृद्ध करण्यासाठी पत्रकारांनाही पेन्शन योजना लागू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित दादा पवार यांच्या सहकार्याने शासनाकडे मागणी करून पत्रकारांच्या कल्याणासाठी आपण कार्यरत राहणार असल्याचे मंगेश चिवटे यांनी सांगितले.
यावेळी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सतीश भाऊ सावंत यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की पत्रकार हा संघटित नसल्यामुळे पत्रकारांच्या मूलभूत प्रश्नाकडे शासन जाणीवपूर्वक लक्ष देतनाही. शासनाने सर्व घटकाला न्याय दिला पण पत्रकारांना मात्र सोयी सवलतीपासून वंचित ठेवण्याचे काम त्यांनी केले आहे. डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष राजा मानेसाहेब यांनी पत्रकारांचे कल्याण करण्याची व्रत हाती घेतले असून मंगेश चिवटे यांच्या सहकार्याने पत्रकारांचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही तन-मन जाण्याने काम करणार आहोत. त्यामुळे पत्रकारांनी आपसातील वैचारिक मतभेद बाजूला ठेवून आपल्या कल्याणासाठी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे.
शासनाकडून आपल्या मागण्या मान्य झाल्यास तुमच्या कुटुंबाचे नक्कीच कल्याण होईल. त्याकरिता जास्तीत जास्त पत्रकार बांधवांनी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेत सहभागी होऊन फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या अधिवेशनात बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सतिश सावंत यांनी केले. पत्रकार दिनानिमित्त आयोजित सन्मान कार्यक्रमांमध्ये ज्येष्ठ पत्रकार महेश चिवटे नासीर कबीर, आशपाक सय्यद ,जयंत दळवी नरेंद्रसिंह ठाकूर सुहास घोलप,दिनेश मडके,अंगद भांडवलकर संजय मस्कर ,नागेश चेंडगे, सूर्यकांत होनप ,राजू सय्यद ,तुषार जाधव, नवनाथ क्षीरसागर यांचा गुलाब पुष्प ,पेन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन करमाळा डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटना करमाळा यांच्यावतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे सचिव नरेंद्रसिंह ठाकुर यांनी केले . यावेळी करमाळा डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे तालुकाध्यक्ष दिनेश मडके यांनी आभार मानुन करमाळा तालुक्याची कार्यकारिणी राजा माने साहेब व जिल्हाध्यक्ष प्रवीण नागणे यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.