जातेगाव-टेंभुर्णी महामार्गावरील भूसंपादनाच्या संदर्भातील अडचणी सोडविण्यासाठी उद्या करमाळ्यात मीटिंग

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – अहमदनगर-जातेगाव करमाळा-टेंभुर्णी महामार्गामध्ये बाधित होणाऱ्या सर्व शेतकऱ्यांच्या भूसंपादनाच्या संदर्भातील अडचणी,तक्रारी व त्यांचे निवारण करण्याकरता उद्या शुक्रवार दिनांक २ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता पंचायत समिती, करमाळा येथील सभागृहामध्ये मीटिंग आयोजित केली असल्याची माहिती माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
या मीटिंग मध्ये महामार्गाशी संबंधित सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत या महामार्गामुळे बाधित होणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी आपल्या समस्यांच्या निराकरणासाठी उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले.



