रमजानच्या इफ्तार पार्टीमुळे भाईचारा प्रस्थापित होण्यास मदत – आमदार नारायण पाटील

करमाळा(दि.२४): रमजानच्या इफ्तार पार्टीमुळे हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये भाईचारा प्रस्थापित होण्यास मदत होते असे प्रतिपादन आमदार नारायण पाटील यांनी केले. करमाळा शहरातील जामा मस्जिद येथे काल सावंत गटाच्या वतीने माजी नगरसेवक संजय सावंत यांनी ईफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी आमदार पाटील बोलत होते.
या ईप्तार पार्टीसाठी आमदार नारायण आबा पाटील, सावंत गटाचे नेते सुनील बापू सावंत, पंचायत समितीचे सदस्य एडव्होकेट राहुल सावंत, नगरसेवक अल्ताफशेठ तांबोळी, माजी नगरसेवक फारुक जमादार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मजहर नालबंद,पै, दादा इंदलकर, माजी नगरसेवक रवींद्र कांबळे, दिपक सुपेकर, युवा नेते अल्लाउद्दीन शेख, सामाजिक कार्यकर्ते फिरोज बेग, भारिप चे देवा लोंढे, राजेंद्र वीर, पप्पू वस्ताद, नागेश उबाळे, आनंद रोडे, जमील काझीआप्पा वीर पांडुरंग सावंत, अमोल मोरे, पप्पू माळी,सिकंदर फकीर आदी जण उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की, अनेक सुफी संत महापुरुषाची विचारधारा समाजामध्ये रुजवणे खूप गरजेचे आहे. रमजान महिन्यातील इफ्तार पार्टी म्हणजे एकमेकांना जोडणारा, समता बंधुता भाईचारा प्रस्थापित करणारा हा महिना. मुस्लिम धर्मियांचा हा पवित्र रमजान महिना धार्मिक व सामाजिक सलोखा आणि शांतता अबाधित ठेवण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहे. आप आपसातील बंधुभाव वाढविण्यासाठी व शांतता व संयम ठेवण्याचे काम रमजानचे रोजे शिकवतात असे यावेळी पाटील म्हणाले.
रोजा ईप्तार पार्टी यशस्वी करण्यासाठी माॅं आयेशा मस्जिद चे विश्वस्त साजीद बेग सामाजिक कार्यकर्ते आलीम खान, वाजीद शेख,अकबर बेग, जहाँगीर बेग, समीर शेख,राजु नालबंद आदी जणांनी परिश्रम घेतले.





