दौंड-कलबुर्गी उन्हाळा विशेष रेल्वे सेवा सुरू - जेऊर, केम, पारेवाडी येथे थांबे - Saptahik Sandesh

दौंड-कलबुर्गी उन्हाळा विशेष रेल्वे सेवा सुरू – जेऊर, केम, पारेवाडी येथे थांबे

संग्रहित छायाचित्र

केम(संजय जाधव) : उन्हाळी सुट्ट्या सुरू होत आहेत आणि प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई-नागपूर / करमळी / तिरुअनंतपुरम, पुणे-नागपूर आणि दौंड-कलबुर्गी दरम्यान उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये करमाळा तालुक्यातील प्रवाशांना दौंड-कलबुर्गी ही रेल्वे सेवा सोयीची आहे. या रेल्वेला तालुक्यातील जेऊर केम पारेवाडी या स्टेशनवर थांबा आहे.

दौंड-कलबुर्गी अनारक्षित विशेष – आठवड्यातून ५ दिवस

ट्रेन क्रमांक 01421 अनारक्षित विशेष ०५.०४.२०२५ ते ०२.०७.२०२५ पर्यंत दौंड येथून आठवड्यातून ५ दिवस (गुरुवार आणि रविवार वगळता) ०५.०० वाजता सुटेल आणि कलबुर्गी येथे त्याच दिवशी ११.२० वाजता पोहोचेल.

ट्रेन क्रमांक 01422 अनारक्षित विशेष ०५.०४.२०२५ ते ०२.०७.२०२५ पर्यंत आठवड्यातून ५ दिवस (गुरुवार आणि रविवार वगळता) कलबुर्गी येथून १६:१० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २२.२० वाजता दौंड येथे पोहोचेल.

दौंड- कलबुर्गी अनारक्षित विशेष – द्विसाप्ताहिक

ट्रेन क्रमांक 01425 अनारक्षित विशेष ०३.०४.२०२५ ते २९.०६.२०२५ पर्यंत दर गुरुवार आणि रविवारी दौंड येथून ५.०० वाजता सुटेल आणि कलबुर्गी येथे त्याच दिवशी रात्री ११:२० वाजता पोहोचेल.

ट्रेन क्रमांक 01426 अनारक्षित विशेष गाडी ०३.०४.२०२५ ते २९.०६.२०२५ पर्यंत दर गुरुवार आणि रविवारी कलबुर्गी येथून २०:३० वाजता सुटेल आणि दौंड येथे दुसऱ्या दिवशी २:३० वाजता पोहोचेल.

01421/01422 आणि 01425/01426 साठी संरचना : १० सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन

01421/01422 आणि 01425/01426 साठी थांबे : भिगवण, पारेवाडी, जेऊर, केम, कुर्डुवाडी, माढा, मोहोळ, सोलापूर, टिकेकरवाडी, होटगी, अक्कलकोट रोड, बोरोटी, दुधनी आणि गाणागापूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!