शिष्यवत्ती परीक्षेत (५वी ) चि .ओम राजकुमार खाडे गुणवत्ता यादीत जिल्ह्यात प्रथम
करमाळा – जुलै २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (५ वी ) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकेवाडी या शाळेतील विद्यार्थी ओम राजकुमार खाडे या विद्यार्थ्याने २९८ पैकी २७८ गुण मिळवून गुणवत्ता यादीत जिल्हयात प्रथम येण्याचा बहुमान मिळाला. या विद्यार्थ्यास वर्गशिक्षिका श्रीमती वनिता बडे ( खाडे ) स्मिता भस्मै (मुख्याध्यापिका- खडकेवाडी), शिक्षक शाम माने ,श्री शकुर शेख यांचे मार्गदर्शन लाभले.
ओमच्या या दैदिप्यमान व उज्ज्वल यशाबदद्ल संजय जावीर( शिक्षणाधिकारी (प्राथ .)सोलापूर), मनोज राऊत ( गटविकास अधिकारी करमाळा), राजकुमार पाटील, (गटशिक्षणाधिकारी करमाळा), जयवंत नलवडे ( शि .विस्तार अधिकारी), महादेव यादव (केंद्रप्रमुख), श्री गहिनीनाथ गणेशकर (सरपंच- देवळाली),आश्विनीताई शिंदे (उपसरपंच-देवळाली) व सर्व सदस्य, सौ. तृप्ती शेळके अध्यक्षा शाळा व्यवस्थापन समिती , राधा जाधव (उपाध्यक्षा शाळा व्यवस्थापन समिती) व सर्व सदस्य आदींनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या.