माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत केमच्या सम्राज्ञी तळेकरचे सुयश

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – केम (ता.करमाळा) येथील श्री ऊतरेश्वर माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थीनी सम्राज्ञी नितीन तळेकर या विद्यार्थिनी माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत करमाळा तालुक्यातील गुणवत्ता यादीत स्थान मिळवले असून ती शिष्यवृत्ती पात्र ठरली आहे. तिने हि परिक्षा फेब्रुवारी २०२२ मध्ये इ ८ वी मध्ये दिली होती. आता तिचा निकाल जाहिर झाला आहे.

सम्राज्ञी तळेकर हीचा सत्कार सुयश क्लासेसचे संस्थापक वसंत तळेकर यांच्या हस्ते करण्यात आला

या यशामागे तिच्या तीचे सहशिक्षक श्री पवार टि,व्ही, श्री कोंडलकर पी,डी सौ नरखेडकर मॅडम, यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. या यशस्वी विद्यार्थ्यांनीचे मुख्य ध्यापक श्री कद्म एस,बी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दयानंद तळेकर,माजी सरपंच अजित दादा तळेकर, युवा सेनेचे जिल्हा समन्वयक सागर तळेकर, सुयश क्लासेस संचालक वसंत तळेकर शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख श्री हरी तळेकर, अध्यक्ष सतीश खानट, जानता राजा स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष समीर भैय्या तळेकर, ऊपसरपंच नागनाथ तळेकर, ग्रामपंचायत सदस्य अनंता तळेकर, केम केंद्राचे केंद्र प्रमुख महेश कांबळे ऊपशिक्षक तुकाराम तळेकर, राम तरकसे यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!