दारू पिऊन मोटारसायकल चालविणाऱ्या सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल.. - Saptahik Sandesh

दारू पिऊन मोटारसायकल चालविणाऱ्या सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : दारू पिऊन मोटारसायकल चालविणाऱ्या लहु बबन सुरवसे (रा.खडकेवाडी, ता. करमाळा) याचे विरूध्द करमाळा पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ३० डिसेंबरला सायंकाळी चार वाजता मौलालीमाळावर घडला आहे.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल दिपक नागन्नाथ कांबळे यांनी पोलीसात फिर्याद दिली असून, त्यात त्यांनी म्हटले आहे, की ३० डिसेंबरला सायंकाळी चार वाजता लहू बबन सुरवसे हा त्याची मोटारसायकल क्र. एमएच ४५ एएम ९६४१ ही अडखळत चालवत होता. त्यास थांबविले असता, त्याच्या तोंडाचा आंबट वास येत होता. त्यानंतर त्याची ब्रेथअनालायझर मशिनद्वारे तपासणी केली असता, तो दारू पिलेला आढळून आला आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

अशाचप्रकारे मद्य प्राशन करून मोटारसायकल चालविणाऱ्या अंकुश वसंत सुरवसे (रा.गोसावीवाडी, ता.परांडा, जि. उस्मानाबाद) याच्याविरूध्दही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे हनुमंत बयाजी धाकतोडे (रोशेवाडी) हे सुध्दा मद्यप्राशन करून त्यांची मोटारसायकल एमएच ४५ एसी २२५९ ही संगमचौकात अडखळत चालवत असताना त्यास आडवले असताना तेही मद्यप्राशन केल्याचे आढळून आले असून त्यांच्याविरूध्दही पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अशाचप्रकारे मोहसीन हमीद मुलाणी (रा. सुमंतनगर, करमाळा) हा सुध्दा त्याच्या ताब्यातील मोटारसायकल एमएच ४५ एएन ७४१० ही ३० डिसेंबरला सायंकाळी पावणेपाच वाजता संगम चौकात मद्यप्राशन करून चालवत असल्याचे स्पष्ट झाले असून त्याच्याविरूध्दही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाचप्रकारे हिरामन भिवा ठोंबरे (रा. साडे) हा त्याच्या ताब्यातील मोटारसायकल क्र. एम. एच. ४५ एक्स ८१५७ ही जेऊर येथे ३१ डिसेंबरला सायंकाळी पावणेसात वाजता अडखळत चालवताना आढळून आला आहे. त्याची तपासणी केली असता, तोही दारू पिलेला आढळून आला आहे.

अशाचप्रकारे करमाळा शहरातील मौलालीमाळावर रविंद्र कोंडिबा विटकर हा आपल्या ताब्यातील मोटारसायकल एम ४५ डब्लू २९३७ ही अडखळत चालवत असताना आढळून आला. त्याची तपासणी केली असता तोही दारू पिलेला सापडला असून त्याच्याविरूध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!